ज्युझेप्पे गारिबाल्दी
Jump to navigation
Jump to search
ज्युझेप्पे गारिबाल्दी (इटालियन: Giuseppe Garibaldi; ४ जुलै १८०७, नीस, पहिले फ्रेंच साम्राज्य - २ जून १८८२, कापेरा, इटलीचे राजतंत्र) हा एक इटालियन लष्करी अधिकारी व राजकारणी होता. इटलीच्या इतिहासामध्ये गारिबाल्दीला मोठे मानाचे स्थान आहे. कामियो बेन्सो दि कावूर, दुसरा वित्तोरियो इमानुएले व ज्युझेप्पे मात्सिनी ह्यांच्यासह गरिबाल्दीला इटलीचा जनक मानले जाते. १९व्या शतकामधील इटलीच्या एकत्रीकरणामध्ये गारिबाल्दीचा महत्त्वाचा सहभाग होता.
गारिबाल्दीच्या लॅटिन अमेरिकेमधील लष्करी हस्तक्षेपासाठी त्याला जगभर प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याचे व्हिक्तोर युगो, अलेक्सांद्र द्युमा, जॉर्ज सॅंड इत्यादी समकालीन फ्रेंच लेखकांनी मोठ्या प्रमाणावर कौतुक केले होते.
गारिबाल्दीचे पुतळे व स्मारके[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |