Jump to content

जेजू प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जेजू या पानावरून पुनर्निर्देशित)
जेजू प्रांत
제주특별자치도
दक्षिण कोरियाचा स्वायत्त प्रांत

जेजू प्रांतचे दक्षिण कोरिया देशाच्या नकाशातील स्थान
जेजू प्रांतचे दक्षिण कोरिया देशामधील स्थान
देश दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
राजधानी जेजू
क्षेत्रफळ १,८४९ चौ. किमी (७१४ चौ. मैल)
लोकसंख्या ५,८३,२८४
घनता २८७ /चौ. किमी (७४० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ KR-49
संकेतस्थळ jeju.go.kr

जेजू (कोरियन: 제주특별자치도) हा दक्षिण कोरिया देशाचा एक स्वायत्त प्रांत आहे. हा प्रांत जेजू ह्याच नावाच्या बेटावर वसला असून जेजू बेट कोरियन द्वीपकल्पाच्या आग्नेय दिशेला प्रशांत महासागराच्या कोरिया सामुद्रधुनीमध्ये स्थित आहे. जेजू ह्याच नावाचे शहर जेजू प्रांतची राजधानी तर सिओग्विपू हे ह्या बेटावरील दुसरे शहर आहे.

जेजू बेट ज्वालामुखीपासून निर्माण झाले असून ह्यासाठी जेजूची युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत निवड झाली आहे. जेजूची अर्थव्यवस्था मासेमारी, शेतीपर्यटनावर आधारित असून दरवर्षी येथे ६० लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: