उल्सान
Appearance
उल्सान 울산 |
|
दक्षिण कोरियामधील शहर | |
उल्सानचे दक्षिण कोरियामधील स्थान | |
देश | दक्षिण कोरिया |
क्षेत्रफळ | १,०५७.१ चौ. किमी (४०८.१ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ५२ फूट (१६ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ११,४५,०९६ |
- घनता | २,९०० /चौ. किमी (७,५०० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी + ९:०० |
ulsan.go.kr |
उल्सान (कोरियन: 울산) हे दक्षिण कोरिया देशामधील सहापैकी एक महानगरी शहर आहे. हे शहर कोरियन द्वीपकल्पाच्या आग्नेय भागात जपानच्या समुद्रकिनाऱ्यावर वसले असून येथील लोकसंख्या सुमारे ११ लाख आहे. उल्सान हे दक्षिण कोरियामधील सर्वात मोठ्या औद्योगिक केंद्रांपैकी एक असून येथील ह्युंडाई मोटार कंपनीचा कारखाना जगातील सर्वात मोठा मोटार वाहन कारखाना तर ह्युंडाई हेवी इंडस्ट्रीजचे डॉकयार्ड जगातील सर्वात मोठे डॉकयार्ड आहे.
२००८ साली उल्सानमधील वार्षिक दरडोई उत्पन्न ६३,८१७ अमेरिकन डॉलर इतके (दक्षिण कोरियामध्ये सर्वाधिक) होते.
खेळ
[संपादन]२००२ फिफा विश्वचषकादरम्यान उल्सान हे एक यजमान शहर होते. येथील उल्सान मुन्सू फुटबॉल स्टेडियममध्ये ३ विश्वचषक सामने खेळवण्यात आले होते.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-01-14 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |