चिंचवाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मालेगाव तालुका

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा नाशिक जिल्हा
जिल्हा उप-विभाग मालेगाव उपविभाग

लोकसंख्या ४६३१

लोकसभा मतदारसंघ धुळे (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ,
आमदार दादाजी भुसे


चिंचावड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

चिंचावड हे गाव नाशिक जिल्ह्यात असून मालेगाव तालुक्यात त्याचा समावेश होतो. मालेगाव शहरापासून १८ किमी अंतरावर गिरणा नदीच्या काठी हे गाव वसलेले आहे. पश्चिमेला सटाणा आणि देवळा तालुक्याच्या सीमा ह्या गावाला लाभलेल्या आहेत.

लोकजीवन[संपादन]

२०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या ४६३१ आहे. गावातील लोकांची प्रमुख भाषा मराठी आहे तर बोलीभाषा अहिराणी (बागलानी स्वरूपातील) आहे. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. तसेच पशुपालन हा द्वितीय व्यवसाय आहे. गावात प्रत्येक वर्षाच्या चैत्र महिन्यात आई सप्तशृंगी देवीची यात्रा भरते.तसेच महाशिवरात्रीला सिद्धेश्वर मंदिरात यात्रा भरते. पुरुष धोतर, पायजमा, शर्ट, पँट हे वस्र परिधान करतात, तर महिला मराठी साडी परिधान करतात.

हवामान[संपादन]

येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.

शेती[संपादन]

चिंचावड गाव गिरणा नदी च्या तीरावर वसलेले असल्यामुळे येथे सुपीक जमीन आहे. गावात पाण्यासाठी सातबाई बंधारा आणि सिद्धेश्वर बंधारा असल्यामुळे पाण्याची सोय आहे. त्यामुळे येथील बहुतांश शेतकरी प्रगतशील बनलेला पहावयास मिळतो. शेड नेट, ठिबक सिंचन, शेतीपंप या आधुनिक तंत्रज्ञााद्वारे शेती केली जाते.

प्रमुख पिके

१) कांदा :- कांदा हे गावातील मुख्य पीक असून बहुतांश शेतकरी कांद्याची लागवड करतात.

२) डाळिंब :- चिंचावड हे मालेगाव तालुक्यातील प्रमुख गावांपैकी डाळिंब उत्पादक गाव आहे.

३) शेवगा :- अलीकडे शेवग्याची शेती मोठ्या प्रमाणात चिंचावड गावात केली जाते.

४) बाजरी:- येथे पावसाळी बाजरीचे पीक मुख्यतः पावसाळ्यात घेतले जाते.

५) गहू:- तुरळक प्रमाणात गव्हाची शेती केली जाते.

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

१)सिद्धेश्वर मंदिर:- येथे भगवान शंकराचे मंदिर आहे. प्रत्येक महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते.

२)सातबाई माता मंदिर:- येथे देवीची यात्रा भरते.

३)झाडूबाबा मंदिर.

४)दत्त मंदिर.

५)सातभाई बंधारा.

६)सिद्धेश्वर बंधारा.

शिक्षण[संपादन]

१) मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचलित, जनता विद्यालय चिंचावड.

२) जिल्हा परिषद शाळा,चिंचावड.

३) जिल्हा परिषद शाळा,काकळीजनगर (चिंचावड).

४) जिल्हा परिषद शाळा, दत्तनगर (चिंचावड).

जवळपासची गावे[संपादन]

आघार बु(ता.मालेगाव),

आघार खु(ता.मालेगाव),

डोंगरगाव (ता.देवळा)

निंबोळा(ता.देवळा),

लखमापूर(ता.सटाणा),

नांदगाव (ता.मालेगाव),

संदर्भ[संपादन]

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate