खीर
खीर हा जेवणातील एक गोड पदार्थ आहे.[१]भारताच्या विविध प्रांतात हा पदार्थ केला जातो. (हिंदी : खीर),(बंगाली : পায়েস), (उडिया : କ୍ଷୀରି), (सिंहली : පායාසම්), (कानडी : ಖೀರು), (तमिळ: பாயசம்) (नेपाळी : खिर), (तेलुगू: పాయసం),(उर्दू: کھیر), (पंजाबी :ਖੀਰ)
स्वरूप
[संपादन]उकळत्या दुधामध्ये तांदूळ, शेवया, साबुदाणा, दलिया, गहु वा अन्य पदार्थ घालून तो शिजविला जातो. त्यात गोडीसाठी साखर वा गूळ घातला जातो. केशर, वेलची, मनुका, बेदाणा, काजू, पिस्ता इत्यादी सुकामेवा आवश्यकतेनुसार घालून खीर तयार केली जाते.[२] गाजर, दुधी भोपळा, लाल भोपळा, खजूर, खसखस , रताळे यांची खीर सुद्धा केली जाते.[३]
धार्मिक महत्त्व
[संपादन]असे मानले जाते की गौतम बुद्ध ध्यानावस्थेत असताना त्यांची प्रकृती अस्थिपंजर झालेली होती. त्यावेळी सुजाता नावाच्या एका युवतीने त्यांनी खीर खायला दिल्याचा उल्लेख सापडतो. वैष्णव संप्रदायात खीर या पदार्थाला धार्मिक महत्त्व आहे. विष्णूला नैवेद्य म्हणून खीर अर्पण केली जाते.[४]इस्लाम धर्मात रमजान ईदच्या पवित्र दिवशी शिरकुर्मा हा पदार्थ करणे अनिवार्य मानले जाते.
संदर्भ
[संपादन]- ^ El-Bakry, Mamdouh; Sanchez, Antonio; Mehta, Bhavbhuti M. (2018-10-22). Microstructure of Dairy Products (इंग्रजी भाषेत). John Wiley & Sons. ISBN 978-1-118-96422-4.
- ^ Dalal, Tarla. Mithai (इंग्रजी भाषेत). Sanjay & Co. ISBN 978-81-86469-38-5.
- ^ Dalal, Tarla (1998-08-19). Eggless Desserts (इंग्रजी भाषेत). Sanjay & Co. ISBN 978-81-86469-19-4.
- ^ Johari, Harish. Ayurvedic Healing Cuisine (इंग्रजी भाषेत). Inner Traditions / Bear & Co. ISBN 978-0-89281-938-6.