दुधी भोपळा
Appearance
दुधी भोपळा (शास्त्रीय नाव: Lagenaria siceraria ; इंग्लिश: Bottle Gourd (बॉटल गूर्ड), Calabash (कालाबॅश) ;) ही वेलवर्गातील एक वनस्पती आहे. या वेलीला फळल्यावर दंडगोलाकार फळे लगडतात व त्यांना त्याच नावाने ओळखले जाते. ही फळे दुधट हिरव्या सालींची व आतून पांढऱ्या, तंतुमय गराची असतात.
इतर वापर
[संपादन]दुधी भोपळ्याच्या आयुर्वेदिक औषधी गुणांमुळे त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे तसेच क जीवनसत्त्व असतात. अन्नाव्यतिरीक्त दुधी भोपळ्याचा वापर इतरत्रही होतो. चांगला वाळलेला दुधी भोपळा नव्याने पोहायला शिकणारे आणि मासेमार पाण्यावर तरंगण्यासाठी वापरतात. वाळलेल्या भोपळ्याचा वापर एकतारी बनण्यासाठीही करतात.
-
बिया
-
वाद्ये बनविण्यासाठी वापर
-
दुधी भोपळ्याचे फूल
-
भांडे म्हणुन वापर
-
दिवा
-
दुधी भोपळ्यापासुन बनविलेला एक प्रकारचा दिवा
-
दुधी भोपळ्याच्या बीया(इंग्रजीत: Lagenaria siceraria var peregrina)
संग्रहालयातील नमूना
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- गूर्ड-झेट.कॉम - दुधी भोपळ्याविषयी माहिती, बातम्या (इंग्लिश मजकूर)