Jump to content

कँपबेल बे राष्ट्रीय उद्यान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कॅंपबेल बे राष्ट्रीय उद्यान या पानावरून पुनर्निर्देशित)
कँपबेल बे राष्ट्रीय उद्यान
national park
स्थापना1992 संपादन
IUCN protected areas categoryIUCN category II: National Park संपादन
देशभारत संपादन
भौगोलिक गुणक७°६′४६″N ९३°४५′४३″E संपादन
Map

कॅंपबेल बे राष्ट्रीय उद्यान हे अंदमान आणि निकोबार द्विपसमूहातील सर्वांत दक्षिणेकडील मोठे निकोबार या बेटावरील राष्ट्रीय उद्यान् आहे. मोठे निकोबार या बेटावरील सर्वांत मोठे गाव कॅंपबेल बे आहे. या गावावरून या उद्यानाचे नाव दिले गेले आहे. बेटाचा ९५

% भूभाग हा अतिशय घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. बेटाचा दक्षिण भाग हा गलाथिया राष्ट्रीय उद्यानात गणला जातो तर उत्तर भाग हा कॅंपबेल बे राष्ट्रीय उद्यानात गणला जातो. दोन्ही एकत्रित राष्ट्रीय उद्याने मिळून एकत्रित मोठे निकोबार बायोस्फेर रिझर्वचा बनवतात. २६ डिसेंबर २००४ रोजी आलेल्या त्सुनामी मध्ये या उद्यानाचे प्रचंड नुकसान झाले. परंतु बेटाच्या उत्तरेकडे असल्याने गलाथिया पेक्षा तुलनेने बरेच कमी नुकसान झाले.

इतर माहितीसाठी पहा गलाथिया राष्ट्रीय उद्यान