किरण खेर
Appearance
(किरोण खेर या पानावरून पुनर्निर्देशित)
किरण खेर | |
विद्यमान | |
पदग्रहण १६ मे २०१४ | |
मागील | पवनकुमार बन्सल |
---|---|
जन्म | १४ जून, १९५५ पंजाब |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
पती | अनुपम खेर |
धर्म | शीख |
किरण खेर ( १४ जून १९५५) ह्या एक भारतीय दूरचित्रवाणी व सिने-अभिनेत्री तसेच भारताच्या सोळाव्या व विद्यमान लोकसभेची सदस्य आहेत. १९८८ सालच्या पेस्तनजी ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या खेरने देवदास, हम तुम, वीर-झारा, फना, रंग दे बसंती, कभी अलविदाना कहना, ओम शांती ओम इत्यादी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.
१९८५ साली किरणने बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर सोबत विवाह केला. २००९ मध्ये किरण खेरने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्या चंदीगड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या. त्यांनी विद्यमान काँग्रेसचे खासदार पवनकुमार बन्सल व आम आदमी पार्टीची उमेदवार गुल पनाग ह्यांचा पराभव केला.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील किरण खेर चे पान (इंग्लिश मजकूर)