औंध संस्थान
औंध संस्थान | ||||
|
||||
| राजधानी | औंध | |||
| सर्वात मोठे शहर | औंध | |||
| शासनप्रकार | राजतंत्र | |||
| राष्ट्रप्रमुख | पहिला राजा: श्री परशुराम त्रिंबक पंत प्रतिनिधी (इ.स.१६९७-१७१७) अंतिम राजा: श्री भवानराव श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी (इ.स. १९३७-४७) |
|||
| पंतप्रधान | परशुरामराव पंत (इ.स.१९४४-१९४८) | |||
| अधिकृत भाषा | मराठी भाषा | |||
| लोकसंख्या | 58,916 (इ.स.१८८१) | |||
| –घनता | ४५.४ प्रती चौरस किमी | |||
औंध संस्थान महाराष्ट्रातील एक संस्थान होते. महाराष्ट्रात ते सातारा औंध या नावाने परिचित आहे. औंध संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते. या संस्थानाची स्थापना सन १६९९ या वर्षी झाली.या संस्थानाची पूर्वीची राजधानी कराड ही होती.
संस्थानिक
[संपादन]औंध संस्थानाची स्थापना परशुराम त्रिंबक पंतप्रतिनिधी यांनी केली. ते देशस्थ ब्राह्मण होते.
औंध संस्थानाचे राजे
[संपादन]पौराणिक इतिहास
[संपादन]औंध हे श्रीमंत पंडित पंतप्रतिनिधी यांच्या संस्थानाचे मुख्य ठिकाण होते. त्या आगोदर औंधला जसा पौराणिक इतिहास आहे तसा मध्य युगीन इतिहासाच्या पाऊल खुणा पाहवयास मिळतात. त्याचा पुरावा म्हणजे औंध गावच्या नैऋत्य दिशेस एका लहानश्या टेकडीवर श्री मुळपीठ यमाई देवीचे जागृत स्थान आहे. शिवाय गावात पद्माळें, नागाळें व विशाळें ही तीन तळी अस्तित्वात होती, त्यापैकी विशाळे हे तळे बुझलेले आहे. उर्वरित दोन तळी अद्याप अस्तित्वात आहेत.
इ.स. १००० ते ११५० पर्यंत औंध वरती देवगिरीच्या यादवांचा अंमल होता. सोळाव्या - सतराव्या शतकात आदिलशाहीचा अंमल कऱ्हाड, सातारा, करवीर या प्रांतावर होता. याच काळात मसूर व औंध या दोन परगण्यांची देशमुखी मसूरचे जगदाळे - पाटील यांच्याकडे होती. औंध परगण्यांत तेव्हा २७ गावे होती. तद्नंतर रक्ताजी रुपजी यांच्याकडे देशमुखी गेल्याचे उल्लेख आढळतात.
१६ शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी बादशाही विरुद्ध उभारलेल्या बंडामुळे त्रस्त झालेल्या आदिलशाहीने महाराष्ट्र मराठी संस्कृती राज्य धुळीत मिळवण्याचा चंग बांधला होता. तेव्हा अफजलखानाने तुळजापूर व पंढरपूर ही ठिकाणे उध्वस्त केल्यानंतर कराड - रहिमतपूर मार्गे औंधकडे मोर्चा वळवला. तेव्हा औंधच्या पुजाऱ्यांनी श्री यमाई देवीच्या मूर्तीस लहानश्या देवळात बंदिस्त करून त्या देवळाला मस्जिदीचे रूप दिले. तेव्हापासून यमाईच्या पुजाऱ्यांपैकी एका शाखेस (फकीर) पुजारी असे म्हणतात. यावेळी औंध गावातील यमाई मंदिरासमोर असलेली महाराष्ट्रातील किंबहुना देशातील सर्वात उंच सुमारे ६५ फुट उंच असलेल्या दीपमाळेचे सौंदर्य व भव्यता पाहून हिंदू मंदिरे धुळीस मिळवणाऱ्या खुद्द अफजलखानाची देखील तिला हात लावायची हिम्मत झाली नाही; अशी बॉम्बे गॅझेट मध्ये नोंद आहे.
इ.स. १७०१ ते १८०६ पर्यंत परशुराम पंतप्रतिनिधी औंधच्या गादीवर राज्य करीत होते. १८०६ साली पेशवाई जप्त झाल्यानंतर १८११ पर्यंतचा कालावधी वगळल्यास सर्वकाळ पंतप्रतिनिधींचा औंध संस्थानावर अंमल राहिला.[३]
भवानराव पंतप्रतिनिधी
[संपादन]औंध संस्थानचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी हे धार्मिक होते, पण दैववादी नव्हते. त्यांची औंधच्या यमाई देवीवर नितांत श्रद्धा होती. सूर्योदयास यमाई देवीच्या दर्शनासाठी ते नित्य मूळपीठ डोंगरावर दर्शनासाठी जायचे. मानवी सामर्थ्यावर व कर्तृत्वावर त्यांचा विश्वास होता. उद्योगाचे महत्त्व त्यांना पुरेपूर पटलेले होते. बहात्तर खेडी आणि अठ्ठेचाळीस वाड्या एवढाच विस्तार असलेले आपले संस्थान उद्योग-व्यवसायांनी फुलावे, फळावे असे स्वप्न त्यांनी पाहिले. संस्थानांतील शाळांमधून तंत्रशिक्षण देण्यावर त्यांचा कटाक्ष होता.या संस्थानमधील श्री.श्री.विद्यालयातून साने गुरुजी ,ग.दि.माडगूळकर,व्यंकटेश माडगूळकर,शंकरराव खरात,मधुकर पाठक (चित्रपट क्षेत्रातील)यांनी शिक्षण घेतले.
स्वदेशी वस्तू हा भवानराव पंतप्रतिनिधींचा जिव्हाळ्याचा विषय होता. संस्थानात शेतांत पिकलेले धान्यच त्यांच्या भोजनात असे. संस्थानामधील विणकरांनी विणलेली साधी वस्त्रेच ते परिधान करीत. सूर्यनमस्कार या जुन्या व्यायामप्रकाराचे त्यांनी शास्त्रशुद्ध संशोधन करून पुनरुज्जीवन केले. ते स्वतः सूर्यनमस्कार घालीत. संस्थानातील शालेय विद्यार्थीही हा व्यायाम करीत . त्यांच्या या सूर्यनमस्कार ‘वेडा’वर आचार्य अत्र्यांनी ‘साष्टांग नमस्कार’ नावाचे नाटक लिहिले. भवानरावांनी ‘बिन भिंतीचा तुरुंग’ ही मॉरिस फ्रेडमन नावाच्या आयरिश माणसाची कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली. उघड्यावर असलेली ती खुनी गुन्हेगारांची वसाहत पुढे ‘स्वतंत्रपूर’ या नावाने ओळखली जाऊ लागली. व्ही.शांताराम यांनी याच संकल्पनेवर ‘दो ऑंखे बारा हाथ’ नावाचा हिंदी चित्रपट काढला. हा चित्रपट जगभरात नावाजला गेला.आजही आटपाडी येथे 'बिन भिंतीचा तुरुंग 'आहे .
भवानरावांना साहित्य, संगीत, शिल्प, चित्र यांची विशेष आवड होती. दर वर्षी राजेसाहेब औंधमध्ये कला प्रदर्शन भरवीत. ते स्वतः चित्रकार होते .त्यांनी काढलेली चित्रे औंधच्या संग्रहालयात आजही आहेत.त्यांनी राजे-रजवाड्यांकडून जुनी चित्रे विकत घेतली. परदेशी जाऊन पाश्चात्य चित्रकारांची काही चित्रे भारतात आणली. काही दुर्मीळ चित्रांच्या नकला करवून आणल्या. आणि या चित्रा-शिल्पांसाठी औंधमध्ये ए्क वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय उभारले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- 1 2 3 Worldstatesmen.org Indiase prinsen A-J
- ↑ Encyclopædia Britannica, eleventh edition (1910-1911)
- ↑ चोरगे, दिनेश (2023-01-06). "साताऱ्यातील प्रसिद्ध औंध संस्थान व मुळपीठ यमाई देवीचा रंजक इतिहास". Pudhari News. 2025-06-20 रोजी पाहिले.