परशुरामराव श्रीनिवास पंतप्रतिनिधी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

परशुराम श्रीनिवास पंतप्रतिनिधी (जन्म १७७७ - मृत्यू १८४८) हे औंध संस्थानाचे लोकप्रिय राजे होते..

दुसऱ्या बाजीरावाचे विश्वासू सरदार बापू गोखले ह्यांच्याशी मसुरेजवळ लढाई झाली, परशुराम पंतप्रतिनिधी यांना त्यांचा हात गमवावा लागला. म्हणून त्यांना लोक थोटेपंत ह्या नावाने देखील ओळखत. पुढे त्यांचे पुण्याला वास्तव्य असताना दुसरा बाजीराव आणि दौलतराव शिंदे हे त्यांच्या मागावर होते आणि त्यांना अटक करण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे पंतांना पुण्यातून पंत प्रतिनिधींची तत्कालीन राजधानी असलेल्या कराडला पळ काढावा लागला.

कर्मधर्मसंयोग असा की खुद्द दुसरा बाजीराव इंग्रजांपासून पळून जात असताना १८१८ साली कराड मुक्कामी होता.

परशुराम पंतप्रतिनिधी यांच्यावरील मराठी पुस्तके[संपादन]

संदर्भ[संपादन]

लोकप्रभा ५ नोव्हेंबर २००४ मधील प्रा. का.धों. देशपांडे ह्यांचा "संगमावरचा भुईकोट" लेख