आदिनाथ कोठारे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आदिनाथ कोठारे हे चित्रपट निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांचे पुत्र असून स्वतः अभिनेते आहेत. बालपणापासूनच त्यांना अभिनयाची गोडी होती.. सुरुवातीलाच ’माझा छकुला’ या चित्रपटात आदिनाथ कोठारे यांना बालकलाकाराची भूमिका करावयाची संधी मिळाली. या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांना प्रोत्साहन मिळत गेले. अभिनय करता करता आदिनाथने एम.बी.ए. पूर्ण केले. रंगमंचावरही ते भूमिका करतात..

’शुभमंगल सावधान’ या चित्रपटाचे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करताना त्यातील अभिनेत्री ऊर्मिला कानिटकर ही आदिनाथ कोठारे यांना आवडली आणि ती आता त्यांची पत्‍नी आहे.


आदिनाथ कोठारे यांनी भूमिका केलेले चित्रपट[संपादन]

  • अनवट
  • झपाटलेला २
  • दुभंग
  • माझा छकुला
  • वेड लावी जिवा
  • शुभमंगल सावधान
  • स्टँडबाय
  • हॅलो नंदन