आशा जोगळेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

आशा जोगळेकर या एक कथ्थक नर्तकी व नृत्यशिक्षिका आहेत. त्यांनी कथ्थक या नृत्यप्रकाराचे शिक्षण देणार्‍या ’अर्चना नृत्यालय’ या संस्थेची स्थापना १५ ऑगस्ट १९६३ रोजी चंद्रपूर या गावी अवघ्या एका विद्यार्थिनीला घेऊन केली. पुढच्या ४० वर्षांमध्ये नृत्यालयाच्या अंधेरी आणि दादर या शाखांत विद्यार्थिनींची संख्या १५०वर गेली.

नृत्यालयाने २००३ साली एक शाखा अमेरिकेतील प्रिन्स्टन (न्यू जर्सी) येथे काढली आणि तेथील काम आपली कन्या आणि अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांच्यावर सोपवली.आशा जोगळेकर ह्या अर्चना जोगळेकर या अभिनेत्रीच्या मातोश्री आहेत. अर्चना जोगळकर लग्नानंतर अमेरिकेत स्थिरस्थावर झाल्या.

प्रगती[संपादन]

’अर्चना नृत्यालया’तील अनेक विद्यार्थिनींना भारत सरकारची ’कल्चरल टॅलेंट’ ही शिष्यवृत्ती मिळाली. अनेक मुली नृत्यस्पर्धांत पारितोषिके मिळवतात. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांसाठी ’अर्चना नृत्यालय’ मुलींची तयारी करून घेते. अनेक मुली नृत्य अलंकार, नृत्य विशारद या परीक्षा देऊन आपली गुणवत्ता सिद्ध करतात.

बाल कलाकार संगीत संमेलन[संपादन]

’अर्चना नृत्यालया’तर्फे मुंबईत दरवर्षी अभिजात नृत्य, गायन वादन या कलांमध्ये उपजतच रस असलेल्या लहान मुलांमुलींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ’बाल कलाकार संगीत संमेलन’ आयोजित करण्यात येते.

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.