Jump to content

उदयनिधी स्टॅलिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उदयनिधी स्टॅलिन
Udhayanidhi Stalin (it); উদয়নিধি স্টালিন (bn); Udhayanidhi Stalin (hu); ઉધયાનિધિ સ્ટાલિન (gu); Udhayanidhi Stalin (sq); Umanidhi Stalin (nb); Udhayanidhi Stalin (pl); Udhayanidhi Stalin (es); Udhayanidhi Stalin (ca); उदयनिधी स्टॅलिन (mr); Umanidhi Stalin (de); Umanidhi Stalin (pt); Umanidhi Stalin (ga); ادهايانيدهى ستالين (arz); Umanidhi Stalin (sv); Umanidhi Stalin (da); Udhayanidhi Stalin (sl); ウダヤニディ・スターリン (ja); Umanidhi Stalin (pt-br); උදයනිධි ස්ටාලින් (si); Udhayanidhi Stalin (id); Umanidhi Stalin (nn); ഉദയനിധി സ്റ്റാലിൻ (ml); Udhayanidhi Stalin (nl); Udhayanidhi Stalin (fr); उधयनिधि स्टालिन (hi); ఉద‌య‌నిధి స్టాలిన్‌ (te); Umanidhi Stalin (fi); Udhayanidhi Stalin (en); Udhayanidhi Stalin (yo); ଉଦୟନିଧି ଷ୍ଟାଲିନ (or); உதயநிதி இசுட்டாலின் (ta) acteur et producteur indien (fr); ભારતીય અભિનેતા અને ફિલ્મ નિર્માતા અને રાજકારણી (gu); ہِندوستٲنؠ اَداکار (ks); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); ଭାରତୀୟ ଅଭିନେତା ଓ ରାଜନୀତିଜ୍ଞ (or); سیاست‌مدار هندی (fa); indisk politiker (da); indisk politiker (sv); indisk politikar (nn); ഇന്ത്യയിലെ രാഷ്ട്രീയ പ്രവർത്തകന്‍ (ml); Indiaas politicus (nl); भारतीय अभिनेता और फिल्म निर्माता और राजनीतिज्ञ (hi); తమిళనాడుకు చెందిన రాజకీయ నాయకుడు, సినీ నటుడు (te); Indian actor and film producer and politician (en); Indian actor and film producer and politician (en); India siyaasa nira ŋun nyɛ doo (dag); indisk politiker (nb); தமிழ்த் திரைப்பட நடிகர் (ta) உதயநிதி ஸ்டாலின் (ta); ユダヤニディ・スターリン (ja)
उदयनिधी स्टॅलिन 
Indian actor and film producer and politician
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखनोव्हेंबर २७, इ.स. १९७७
चेन्नई
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. २००९
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • Loyola College
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
  • Member of the Tamil Nadu Legislative Assembly
वडील
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

उदयनिधी स्टॅलिन (२७ नोव्हेंबर, १९७७) हे एक भारतीय चित्रपट निर्माते, राजकारणी आणि माजी अभिनेता आहेत. स्टॅलिन यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत काम केले आहे. डिसेंबर २०२२ मध्ये त्यांचे वडील तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील मंत्रालयात त्यांना युवक कल्याण आणि क्रीडा विकास, विशेष कायदा अंमलबजावणी विभाग, तामिळनाडूचे मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. चेपौक-थिरुवल्लिकनी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे ते तामिळनाडू विधानसभेचे सदस्य आहेत.

कुरुवी (२००८), आधारन (२००९), मनमादन अंबु (२०१०) आणि 7ओम अरिवू (२०११) या तमिळ भाषेतील चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. त्यांनी रेड जायंट मूव्हीज या प्रोडक्शन स्टुडिओच्या माध्यमातून निर्माता आणि वितरक म्हणून चित्रपट उद्योगात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी विनोदी - प्रणयपट, ओरु कल ओरू कन्नडी (२०१२) मध्ये अभिनेता म्हणून प्रथम काम केले आणि तेव्हापासून त्यांनी स्वतःच्या चित्रपट निर्मिती आणि अभिनय अशी दोन्ही जिम्मेदाऱ्या निभावल्या.[]

प्रारंभिक जीवन

[संपादन]

उदयनिधी स्टॅलिन हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचे नातू आहेत. त्यांनी डॉन बॉस्को शाळेत शिक्षण घेतले आणि त्यानंतर चेन्नईच्या लोयोला कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवी घेतली.[][] त्यांचे बरेचशे नातेवाईक १९५० पासून राजकारणात आणि तमिळ चित्रपटसृष्टीत सक्रियपणे सहभागी आहेत. त्यांचे चुलत भाऊ अरुलनिथी आणि दयानिधी अझागिरी हे देखील अनुक्रमे अभिनेता आणि निर्माता आहेत.[]

राजकीय कारकीर्द

[संपादन]

उदयनिधी स्टॅलिन यांचे अण्णा विद्यापीठाच्या सिंडिकेटचे सदस्य म्हणून तीन वर्षांच्या कालावधीसाठी नामांकन करण्यात आले. १३ सप्टेंबर २०२१ रोजी विधानसभेत सभापती एम. अप्पावू यांनी ही घोषणा केली होती.[]

स्टॅलिन यांनी १४ डिसेंबर २०२२ रोजी तामिळनाडूमधील त्यांच्या वडिलांच्या मंत्रिमंडळात युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री म्हणून शपथ घेतली.[]

विवाद

[संपादन]

उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना "डेंग्यू", "मलेरिया" आणि "कोविड" यांच्याशी केली आणि नुसत्या विरोध न करता, "निर्मूलन" देखील केले पाहिजे, असे म्हटल्याने मोठा वाद निर्माण झाला. ' सनातना निर्मूलन परिषदे'त बोलताना उदयनिधी म्हणाले की, सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे.[] []

त्यांच्या वक्तव्यावर तामिळनाडू भाजपचे प्रमुख के अन्नामलाई यांनी टीका केली. त्यांनी म्हणले की, "सनातन धर्म हा हजारो वर्षांपासून असून स्टॅलिन हे केवळ आपल्या आजोबा आणि वडीलांमुळे या पदावर आहेत. सनातन धर्माला मुगल किंवा ईस्ट इंडिया कंपनी देखील नष्ट करू शकली नाही.[] हिंमत असेल तर त्यांनी आपल्या आईला मंदिरात जाण्यापासून रोखावे."[१०] केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही त्यांच्या वक्तव्यावर टीका केली आणि आरोप केला की आय.एन.डी.आय.ए. राजकीय युती ही "हिंदू धर्माचा द्वेष करते" आणि ही युती एकगठ्ठा 'व्होट बँक' आणि 'तुष्टीकरण' राजकारणाचा भाग आहे.[११]

दरम्यान, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उदयनिधी यांच्या वक्तव्यापासून पक्षाला दूर ठेवले. पटोले म्हणाले की, 'काँग्रेस पक्ष सर्व धर्मांचा आदर करतो आणि कोणाच्याही भावना दुखावतील अशी कोणतीही टिप्पणी करू इच्छित नाही.'[१२] तृणमूल काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि आम आदमी पार्टी, जे विरोधी आय.एन.डी.आय.ए. ब्लॉकचा भाग आहेत, त्यांनी देखील स्तली वक्तव्यापासून स्वतःला दूर केले.[१३]

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील विनीत जिंदाल यांनी उदयनिधी यांच्या विरोधात दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल केला आणि स्टॅलिन यांच्या टिप्पणीला सनातन धर्माविरुद्ध "प्रक्षोभक, प्रक्षोभक आणि बदनामीकारक' विधान म्हणले. त्यांच्यावर आयपीसी आणि आयटी कायद्याच्या कलम 120B, 153A, 295 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे".[१४] अजून एक वकील, सुधीर कुमार ओझा यांनी देखील बिहारमधील मुझफ्फरपूर मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर तक्रार दाखल केली आणि दावा केला की उदयनिधी यांच्या विधानाने 'कोट्यावधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत'.[१५]

स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर नाराज असलेल्या देशभरातील मान्यवर अशा २६० लोकांनी सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना एक पत्र लिहून यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या पत्रावर सही करणाऱ्यात माजी न्यायाधीश एस.एन. धिंग्रा सह १४ निवृत्त्त न्यायाधीश, १३० माजी नोकरशाह तसेच १८८ निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.[१६]

अयोध्येतील एक संत यांनी तर अशी घोषणा केली की, "स्टॅलिन यांच्या शिरच्छेद करणाऱ्याला १० कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. जर कुणी हे काम केले नाही तर मी स्वतः त्यांना शोधून ठार करेल. त्यांनी या देशातील १०० कोटी लोकांचा अपमान केला असून त्यांनी यावर माफी मागावी."[१७]

फिल्मोग्राफी

[संपादन]

अभिनेता म्हणून

[संपादन]
उदयनिधी स्टॅलिन चित्रपटाच्या श्रेय कलाकारांची यादी
वर्ष शीर्षक भूमिका नोट्स
२००९ आधवन नोकर पाहुणे कलाकार
२०१२ ओरु कल ओरु कन्नडी सर्वानन (अभिनेता तसेच निर्माता)
सर्वोत्कृष्ट पुरुष नवोदितासाठी SIIMA पुरस्कार
सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणासाठी फिल्मफेर पुरस्कार -
दक्षिण सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्यासाठी नॉर्वे तमिळ चित्रपट महोत्सव पुरस्कार
२०१३ वनक्कम चेन्नई फ्लॅट भाडेकरू पाहुणे कलाकार
२०१४ इधू कथिरवेलन काधळ कथिरवेलन तसेच निर्माता
२०१५ नन्नबेंडा सत्या तसेच निर्माता
२०१६ गेथु सेतू तसेच निर्माता
मनिथन शक्तीवेल तसेच निर्माता
२०१७ सर्वानन इरुक्का बायमाइन सर्वानन तसेच निर्माता
पोधुवगा इम्मानासु थंगम गणेश
इप्पडाई वेल्लम मधुसूधनन
२०१८ निमीर सेल्वम
२०१९ काणे कलाईमाने कमला कन्नन तसेच निर्माता
२०२० सायको गौतम
२०२२ नेन्जुकु नीधी एस. विजयराघवन
कलगा थलायवन तिरुमारन तसेच निर्माता
२०२३ कन्नई नंबाथेय अरुण [१८]
मामन्नन अथिवीरन (वीर) तसेच निर्माता [१९]

निर्माता म्हणून

[संपादन]
उदयनिधी स्टॅलिन चित्रपटाच्या श्रेयांची यादी निर्माता म्हणून
वर्ष चित्रपट नोट्स
२००८ कुरुवी
२००९ आधवन
२०१० मनमदन अंबु
२०११ 7 ओम अरीवू
२०१२ नीरपरावई
२०१३ वनक्कम चेन्नई
इंडियन २ चित्रीकरण [२०]

वितरक म्हणून

[संपादन]
वितरक म्हणून स्टॅलिन यांच्या चित्रपटांची यादी
वर्ष चित्रपट नोट्स
२०१० विन्नैतांडी वरुवाया
२०१० मड्रासपट्टीणम
२०१० बॉस इंजिरा भास्करन
२०१० म्याना
२०१९ बकरीद
२०२१ अरमानाई ३
२०२२ राधे श्याम तामिळ आवृत्ती
२०२२ कथुवाकुला रेंदु काधळ
२०२२ बिस्ट
२०२२ डॉन
२०२२ विक्रम
२०२२ कोब्रा
२०२२ कॅप्टन
२०२२ वेंदु थनिधाथु काडू
२०२२ पोन्नियिन सेल्वन: १
२०२२ लव्ह टुडे
२०२३ थुनिवु
२०२३ वारिसू
२०२३ पोन्नियिन सेल्वन: II
२०२३ माविरन

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Redgiant Movies". redgiantmovies.in. 10 May 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 March 2021 रोजी पाहिले.
  2. ^ Govardan, D (20 March 2021). "Tamil Nadu: 7 alumni from Egmore Don Bosco school in fray for assembly election". द टाइम्स ऑफ इंडिया. 4 May 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 May 2021 रोजी पाहिले.
  3. ^ Subramanian, Lakshmi (25 September 2010). "Udhayanidhi Stalin: Right Heir, Right Now". India Today. 4 May 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 October 2018 रोजी पाहिले.
  4. ^ "Arulnithi Tamilarasu Blessed With Baby Boy!". JFW Online. 26 October 2016. 24 October 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 March 2021 रोजी पाहिले.
  5. ^ "Udhayanithi Stalin gets additional post as a member of Board of Governors of Anna University". dtNext.in (इंग्रजी भाषेत). 13 September 2021. 14 September 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 September 2021 रोजी पाहिले.
  6. ^ "Udhayanidhi Stalin sworn in as Tamil Nadu minister for Youth Welfare and Sports Development". 1 January 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 January 2023 रोजी पाहिले.
  7. ^ "'Sanatana dharma like malaria, dengue...': MK Stalin's son Udhayanidhi sparks row". India Today (इंग्रजी भाषेत). 2023-09-02 रोजी पाहिले.
  8. ^ Bureau, The Hindu (2023-09-02). "Sanatana is against social justice and has to be eradicated: Udhayanidhi". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2023-09-02 रोजी पाहिले.
  9. ^ "Sanatana Dharma should be eradicated: M K Stalin son's statement stokes controversy".
  10. ^ "'आधी आपल्या आईला मंदिरात जाण्यापासून रोखा', भाजप नेत्याचे उदयनिधी स्टॅलिनला आव्हान". ६ सप्टेंबर २०२३ रोजी पाहिले.
  11. ^ "Amit Shah slams Udhayanidhi Stalin's Sanatana Dharma remark, calls it 'vote bank politics'". The Week (इंग्रजी भाषेत). 2023-09-03 रोजी पाहिले.
  12. ^ "MK Stalin's Son's "Eradicate Sanatana Dharma" Remark Sparks Huge Row". NDTV.com. 2023-09-03 रोजी पाहिले.
  13. ^ "How Udhayanidhi Stalin's 'Sanatana Dharma' remark divided INDIA". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2023-09-05. 2023-09-05 रोजी पाहिले.
  14. ^ "Udhayanidhi Stalin's 'Sanatan Dharma' Remark: SC Lawyer Files Complaint With Delhi Police, Seeks FIR Against DMK Leader". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 2023-09-03 रोजी पाहिले.
  15. ^ Bhelari, Amit (2023-09-04). "Complaint filed against Udhayanidhi Stalin in Muzaffarpur court for his remarks on Sanatana Dharma". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2023-09-05 रोजी पाहिले.
  16. ^ "Udhayanidhi Stalin : उदयनिधी स्टॅलिन यांचे वक्तव्य द्वेषमूलक; देशभरातील मान्यवरांचे सरन्यायाधीशांना पत्र". ६ सप्टेंबर २०२३ रोजी पाहिले.
  17. ^ "उदयनिधी स्टॅलिन यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 10 कोटी देणार, अयोध्येच्या संत परमहंस यांची घोषणा". 2023-09-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ६ सप्टेंबर २०२३ रोजी पाहिले.
  18. ^ "Kannai Nambathey Movie Review: Kannai Nambathey falters despite a thrilling setup". द टाइम्स ऑफ इंडिया. 17 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 March 2023 रोजी पाहिले.
  19. ^ "First Shooting Schedule of Mari Selvaraj's Maamannan Wrapped". News18 (इंग्रजी भाषेत). 30 March 2022. 23 April 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 April 2022 रोजी पाहिले.
  20. ^ "Indian 2 update: Kamal Haasan, Shankar finally march past multiple obstacles". Cinema Express. 24 August 2022. 23 August 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 August 2022 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]