आसाराम बापू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आसाराम बापू
Asharam ji Bapu.jpg
पूर्ण नावआसुमल थाऊमल सिरुमलानी
जन्म एप्रिल १७ इ.स. १९४१
चैत्र कृष्ण ६, शा.श. १९९८
बेरानी, नवाब जिल्हा, सिंध
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा गुजराती, हिंदी, इंग्रजी व अन्य अनेक भाषा[ संदर्भ हवा ]
प्रमुख विषय वेद, राजयोग, भक्तियोग
प्रसिद्ध लिखाण आश्रमातर्फे नित्य पुस्तके प्रकाशित
प्रभाव लीलाशाह बापू
प्रभावित सुरेशानंदजी महाराज, नारायण सांई,
यांच्यासह भारतातील असंख्य भक्तगण
वडील थाऊमल सिरुमलानी
आई महेंगीबा
संकेतस्थळ आश्रम.ऑर्ग

आसाराम बापू, जन्म नाव आसुमल थाऊमल सिरुमलानी, (एप्रिल १७ इ.स. १९४१ - हयात) हे वर्तमान काळातील एक संत आहेत. त्यांचे अनुयायी त्यांना "बापूजी" या आदरवाचक नावाने उल्लेखतात. सप्टेंबर १, इ.स. २०१३ रोजी आसाराम बापूंना अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली त्यांच्या इंदूर येथील आश्रमातून अटक झाली आणि तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.

जन्म[संपादन]

आसाराम बापू यांचा जन्म भारताच्या सिंध प्रांतातील नवाब जिल्ह्यातील बेरानी या लहानशा खेड्यात झाला. त्यांचा जन्म होत असतांना गावातून एक पाळणेवाला जात होता. तेव्हा त्या पाळणेवाल्याला गावात कुणीतरी संत जन्म घेत असल्याची उपजत प्रेरणा झाली[ संदर्भ हवा ] आणि तो पाळणा घेऊन तेथे दाखल झाला, अशी आख्यायिका आहे. ही अपूर्व घटना पाहून घरातील मंडळींच्या आनंदाला पारावार उरला नाही. हे बाळ तीन बहिणींच्या पाठीवर जन्मले हॊते. त्यांचे नाव ’आसुमल’ ठेवले गेले.

बालपण[संपादन]

आसुमल (आसाराम बापू ) यांची आई मेहंगीबा यांनी त्यांना लहानपणापासूनच ध्यान व पूजा करणे शिकविले हॊते. तेव्हापासून त्यांना ध्यानाची आवड आणि भक्तीची ओढ लागली होती. १९४७ मध्ये हिंदुस्थान देशाचे विभाजन झाले तेव्हा त्यांचे कुटुंब पाकिस्तानमध्ये आपली संपत्ती सोडून भारतात अहमदाबादला आले. त्यांचे शालेय शिक्षण सुरू झाले असले तरी त्यांना शिक्षणात रुची नव्हती, त्यांची खरी ओढ अध्यात्माकडेच होती. शाळेमध्ये मधली सुटी झाल्यावर जेव्हा इतर मुले खेळात मग्न होत, तेव्हा आसुमल ईश्वराचे ध्यान करीत असत. शाळेतदेखील या आसुमलचा हसरा स्वभाव बघून शिक्षक त्यांना ’हसमुखभाई’ म्हणत. दरम्यानच्या काळात त्यांच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा त्यांना आपल्या राहत्या घराला निरोप द्यावा लागला. त्यामुळे त्यांचे सर्व वैभव आणि शालेय शिक्षण तेथेच सुटले.

आध्यात्मिक प्रवास[संपादन]

युवावस्था[संपादन]

जीवनातील संघर्ष सुरू असतांना ते सिद्धपूर येथे नोकरी करण्यासाठी आले. तेथील कृष्णमंदिरात जाऊन ते नित्य ध्यान करीत आणि व्याकुळ होऊन अश्रू ढाळीत. नोकरी करीत असताना एक घटना घडली ती अशी - एक दिवस एक महिला त्यांच्याकडे येऊन म्हणाली की, "खोट्या खुनाच्या खटल्यात माझी दोन्ही मुले कारागृहात आहेत. त्यामुळे मला अतिशय दुःख होत आहे" तेव्हा आसुमल म्हणाले की, "चिंता करू नका. तुमची मुले निर्दोष सुटून घरी येतील." आणि त्यानंतर खरोखरच तसे घडले[ संदर्भ हवा ]. आसुमलची ही तथाकथित वाचासिद्धी पाहून जनमानसांवर त्यांचा प्रभाव पडू लागला[ संदर्भ हवा ]. सिद्धपूर येथे तीन वर्षे नोकरी केल्यानंतर ते अहमदाबादला परतले.

Bapu3.jpg

सांसारिक जीवन[संपादन]

आता आसुमलची आई त्यांच्या लग्नाचा विचार करू लागली. परंतु आसुमलचे मन पूर्णतः विरक्त होते. तरीही सर्वांनी बळजबरीने त्यांचा साखरपुडा केला. जेव्हा लग्न करून देण्याची तयारी सुरू झाली तेव्हा आसुमलने घरातून पलायन केले. या विरक्त आसुमलला शोधता शोधता सर्वांची दमछाक झाली.. शेवटी ते भरुच येथे अशोक आश्रमात सापडले. घराण्याच्या अब्रूची आण देऊन त्यांना आदिपूरला आणण्यात आले. तेथे त्यांचे लग्न ’लक्ष्मीदेवी’ यांच्याशी लावून दिले. तरीही आसुमलचे मन ईश्वराशिवाय कुठेच लागत नव्हते. संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करीत असताना एक श्लोक त्यांच्या मनी वसला. ते थेट पत्‍नीकडे आले आणि तिला समजावले की, "मी आता घर सोडून जात आहे. ईश्वरप्राप्‍ती करून पुन्हा परत येईन."

ईश्वराचा शोध[संपादन]

आसुमल घराचा त्याग करून ईश्वरप्राप्‍तीसाठी निघाले. केदारनाथवृंदावन येथे देवदर्शन करीत असतांना त्यांना नैनीताल येथे जाण्याची प्रेरणा मिळाली. तेथे गेल्यावर त्यांना लीलाशाह बापू भेटले. ७० दिवसांची कठोर परीक्षा घेऊन लीलाशाहजींनी आसुमलला शिष्य म्हणून स्वीकारले. परंतु "ध्यान आणि भजन घरीच करीत जा." असा आदेश दिला.

गुरूंच्या आज्ञेने घरी परतत असतांना ते एका रात्री नर्मदा नदीकिनारी ध्यानास्थ बसले होते. कुणीतरी डाकू असावा असा विचार करीत लोक लाठ्या-काठ्या घेऊन त्यांना मारण्यासाठी धावले. तेव्हा आसुमलचे ध्यान तुटले आणि त्यांनी डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावरील अपूर्व तेज पाहून कुणी त्यांना मारण्यास धजावले नाही[ संदर्भ हवा ]. ते उठले आणि चालू लागले.
त्यानंतर त्यांच्या आई व पत्‍नी तेथे दाखल झाल्या. सर्व लोकांनी समजूत काढून आसुमलला त्यांच्याबरोबर धाडले. मात्र, अहमदाबादला जात असतांना मियांगाव येथून पळून ते गुरूंना भेटण्यासाठी मुंबईला आले.

ईश्वरप्राप्‍ती[संपादन]

लीलाशाह बापू आपल्या प्रिय शिष्याला पाहून अतिशय आनंदित झाले. आसुमलची ईश्वरासाठीची ओढ पाहून त्याला परमतत्त्वाचे दर्शन करवून देण्याचे त्यांनी ठरविले. गुरुकृपेने आश्विन शुद्ध द्बितीया या दिवशी आसुमलला आत्मसाक्षात्कार झाला असे मानले जाते. तेव्हापासून ते संत आसाराम बापू म्हणून ओळखले जाऊ लागले.

लैंगिक छळाचा आरोप[संपादन]

ऑगस्ट २०१३मध्ये आसारामजी बापूंवर आपल्या जोधपूरच्या आश्रमात एका सोळा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला गेला. भूतप्रेताच्या तावडीतून तिची सुटका करण्याच्या बहाण्याने हा प्रकार केल्याचा दावा आहे.[१][२][३][४][५] [६] त्यानंतर आसाराम बापू पोलिसांत हजर न झाल्याने[७] दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय दंडविधान कायदा कलम ३४२, ३७६, ५०६ खाली आणि ज्युव्हेनाइल जस्टिस तसेच प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस खाली अटक करण्याची तयारी केली.[८]

विरोध[संपादन]

आसाराम बापू यांनी आपल्या इंदूरमधील आश्रमात आसरा घेतला आणि त्यांच्या भक्तांनी बाहेर पोलीस आणि पत्रकारांशी झटापटी चालू ठेवल्या.[७] अखेर १ सप्टेंबर २०१५ रोजी जोधपूर पोलिसांनी त्यांना आश्रमात जाऊन अटक केली.[५][९] आसाराम बापूने मुलीने लावलेला आरोप नाकारला आहे.[१०] या मुलीला राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी भरीस पाडून आपल्याला संकटात आणल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.[११][१२]

देशविदेशात पसरलेले आसाराम बापूंचे लाखो भक्त देखील सदरील मुलीने केलेले आरोप पूर्णतः खोटे असल्याचा दावा करून बापू निर्दोष असल्याचे सांगतात. अनेक ठिकाणी भक्तांद्वारे बापूंच्या सुटकेसाठी निदर्शने, संत संमेलने इत्यादी केली गेली.


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.Unbalanced scales.svg
या लेख/विभागाच्या नि:पक्षपातीपणाबद्दल वाद आहे.
कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहा.


जन्मठेप[संपादन]

आसाराम बापूंनी केलेल्या बलात्कारादी गुन्ह्यासाठी त्यांना आजन्म कारावास भोगण्यासाठी तुरुंगात डांबले आहे. त्यांचा मुलगा नारायण साई याला अशाच आरोपाखाली सुरत सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा आणि एक लाखांचा दंड ठोठावला आहे. त्याच्या चार साथीदारांना प्रत्येकी १०-१० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

पुस्तक[संपादन]

आसाराम बापू यांच्या जीवनावर आऊटलुक नियतकालिकाचे उपसंपादक शोधपत्रकार उशीनर मजुमदार (Ushinor majumdar) यांनी 'गॉड ऑफ सिन : द कल्ट, द क्लाउट ॲन्ड डाऊनफॉल ऑफ आसाराम बापू' नावाचे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकावर आधारित एक चरित्रपट होऊ घातला आहे. बॉलिवूड निर्माते सुनील बोहरा हे या बायोपिकची निर्मिती करणार आहेत.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "Controversial godman: Can Asaram come clean on the rape allegations?". Hindustan Times (इंग्लिश मजकूर). August 29, 2013. 2013-09-02 रोजी पाहिले. [मृत दुवा]
 2. ^ "Rajasthan Police dispatches team to interrogate Asaram Bapu in rape case". India Today (इंग्लिश मजकूर). August 26, 2013. 2013-09-02 रोजी पाहिले. 
 3. ^ "After rape, Asaram Bapu threatened me to keep quiet, says girl". Financial Express (इंग्लिश मजकूर). August 26, 2013. 2013-09-02 रोजी पाहिले. 
 4. ^ "Despite allegations ranging from murder to rape, why has Asaram Bapu never been arrested? 'BJP states' hold the answer". Daily Bhaskar (इंग्लिश मजकूर). August 25, 2013. 2013-09-02 रोजी पाहिले. 
 5. a b "Asaram Bapu brought to Jodhpur after late night arrest" (इंग्लिश मजकूर). NDTV. September 1, 2013. 2013-09-02 रोजी पाहिले. 
 6. ^ "Asaram Bapu rape case: Medical test confirms sexual assault of victim". India Today. August 21, 2013. 2013-09-02 रोजी पाहिले. 
 7. a b Singh, Mahim Pratap (August 31, 2013). "Asaram supporters attack on journalists condemned" (इंग्लिश मजकूर). The Hindu. 
 8. ^ FIR registered by victim against Asaram Bapu reveals a horrific tale of sexual assault : North, News - India Today|भाषा=इंग्लिश
 9. ^ "Indian guru Asaram Bapu arrested over rape claims". September 1, 2013. 
 10. ^ "Bakwaas: Asaram Bapu's response to charges that he threatened teen girl". NDTV. August 27, 2013. 
 11. ^ "Asaram Bapu says Sonia Gandhi and her son Rahul behind conspiracy against him in sexual assault case" (इंग्लिश मजकूर). इंडिया टुडे. २०१३-०८-२९. 2013-09-02 रोजी पाहिले. 
 12. ^ "आसाराम बापूंचे म्हणणे : सोनिया आणि राहुलने माझ्याविरुद्ध मोहीम उघडली आहे" (इंग्लिश मजकूर). डेक्कन क्रॉनिकल. २०१३-०८-२९. 2013-09-02 रोजी पाहिले.