आरती कुंडलकर
आरती ठाकूर- कुंडलकर ह्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या भारतीय गायिका आहेत.[१] [२]
क्रमिक शिक्षण
[संपादन]त्यांनी कॉमर्समधली पदवी प्राप्त केल्यावर त्यांनी एस.एन.डी.टी. विद्यापीठातून पद्व्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांनी गांधर्व महाविद्यालातून संगीत विशारद पूर्ण केले आहे.[३]
संगीत शिक्षण
[संपादन]कुंडलकर ह्यांनी वयाच्या अकराव्या वर्षापासून किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका लीलाताई घारपुरे ह्यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले.[४] त्यानंतरचे संगीताचे शिक्षण त्यांनी किराणा घराण्याच्याच गायिका डॉ. प्रभा अत्रे ह्यांच्याकडे घेतले. डॉ. अरविंद थत्ते यांच्याकडे संवादिनी वादनाचे शिक्षण घेतले. ख्याल गायकीच्या व्यतिरिक्त कुंडलकर ह्या डॉ. संजीव शेंडे ह्यांच्याकडे उपशास्त्रीय संगीताचे ठुमरी, दादरा, गझल हे प्रकारदेखील शिकल्या आहेत.[५]
आरती ठाकूर-कुंडलकर या आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत.[६]
त्यांच्या गायन शैलीचे कौतुक पं. भीमसेन जोशी, पं. फिरोज दस्तूर ह्यांच्या सारख्या मोठ्या कलाकारांकडून केले गेले आहे.[७] त्यांनी त्यांच्या गुरू डॉ. प्रभा अत्रे ह्यांना सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये केलेल्या गायनाच्या साथीला श्रोत्यांकडून नावाजले गेले.[८] त्या दहा वर्षांपेक्षा जास्त वर्षे विद्यार्थ्यांना शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताचे शिक्षण देत आहेत. त्या पुण्यातील ललित कला केंद्रात गायनशिक्षक आहेत. [९]
कार्यक्रम
[संपादन]आरती ह्यांनी भारतात आणि जगभरात अनेक कार्यक्रम सादर केले आहेत. त्यांपैकी काही कार्यक्रम आणि ते जेथे सादर केले त्या संस्था :
- बरसे बदरिया- वर्षा ऋतूवरील काही रचनांचा कार्यक्रम[१०]
- बसंत रंग- वसंत ऋतूवरील रचनांचा कार्यक्रम[११]
- बंदिश- डॉ. प्रभा अत्रे आणि डॉ. अश्विनी भिडे ह्यांच्या रचनांचा कार्यक्रम[१२]
- सईंया निकस गये- ठुमरी आणि दादरा ह्या उपशास्त्रीय प्रकारातील रचनांवर आधारीत[१३]
- रामदास पडवळी- चैतन्य कुंटे ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या स्वामी रामदासांच्या रचना[१४]
- घराणा संमेलन, सवाई गंधर्व स्मारक, पुणे[१५]
- दक्षिण मध्य झोन युवा महोत्सव, भिलाई[१६]
- साधना कला मंच, पुणे[१७]
- यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह, अंबेजोगाई[१८]
- नवरत्न महोत्सव, लातूर[१९]
- सवाई गंधर्व संगीत महोत्सव, कुंदगोळ[२०]
- डॉ. प्रभा अत्रे ह्यांच्या पंचहात्तराव्या वाढदिवसाच्या वर्षी आयोजित केलेला कार्यक्रम, मुंबई[२१]
- एन. सी. पी. ए. आणि पु. ल. देशपांडे फाउंदेशन, मुंबई, पुणे, कोल्हापूर
- अहमदनगरचे सरगम प्रेमी मित्र मंडळ
- कैलासवासी उस्ताद अब्दुल करीम खान मेमोरियल महोत्सव, मिरज
- पुण्याचा सह्याद्री स्वर मंच
- अहमदाबाद महाराष्ट्र समाज
- पुण्याची गानवर्धन संस्था
- जुन्नरचे कलोपासक मंडळ
- पुण्याची ओमकार संगीत धारा (संस्था)
- पुण्याची सूरसांगत संस्था
- पुण्याचे महाराष्ट्र सांस्कृतिक भवन
- आरती कुंडलकर तांनी प्रसिद्ध भारतनाट्यम नृत्यांगना डॉ. सौ. सुचेता भिडे चाफेकर ह्यांना नृत्याच्या वेळी गायनाची साथ केली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या गुरू डॉ. प्रभा अत्रे ह्यांच्या रचना सादर केल्या. हा कार्यक्रम नवी दिल्लीमध्ये झाला.
आरती कुंडलकर यांना मिळालेले पुरस्कार
[संपादन]त्यांना बरेच मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.
- तारांगिणी प्रतिष्ठानचा पं. जितेंद्र अभिषेकी युवा पुरस्कार[२२]
- पुण्याच्या गांधर्व महाविद्यालयाकडून पं. रामकृष्णबुवा वझे युवा गायक पुरस्कार[२३]
- पुण्याच्या पं. जसराज मित्र मंडळाचा पैंगणकर पुरस्कार
- मुंबईच्या सूर-सिंगार संसदेचा सूर-मणी पुरस्कार
- पुण्याच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात परुंडेकर पुरस्कार
संदर्भ
[संपादन]- ^ "Arati Thakur - Kundalkar | RagaNXT". raganxt.com (इंग्रजी भाषेत). 2019-11-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-05-05 रोजी पाहिले.
- ^ "Arati Thakur - Kundalkar | RagaNXT". raganxt.com (इंग्रजी भाषेत). 2019-11-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-05-05 रोजी पाहिले.

- ^ "Book Arati Thakur-Kundalkar for event | Request Arati Thakur-Kundalkar for performance | Learn Hindustani Classical Vocal, Kathak, Tabla, Light Vocal, Flute, Harmonium, Sitar, Modern dance forms, Bharatnatyam". meetkalakar.com. 2020-05-05 रोजी पाहिले.