Jump to content

इंटरस्टेट ७१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आय-७१ या पानावरून पुनर्निर्देशित)
अमेरिका  राष्ट्रीय महामार्ग ७१
लांबी ५५६.१४ किमी
सुरुवात लुईव्हिल
मुख्य शहरे सिनसिनाटी, कोलंबस, रिचफील्ड
शेवट क्लीव्हलंड
जुळणारे प्रमुख महामार्ग
राज्ये केंटकी, ओहायो
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

आय-७१ तथा इंटरस्टेट ७१ हा अमेरिकेतील महामार्ग आहे. देशाच्या साधारण उत्तर-मध्य भागात नैऋत्य-ईशान्य धावणारा हा रस्ता केंटकी राज्यातील लुईव्हिल शहराला ओहायो राज्यातील क्लीव्हलंड शहराला जोडतो.

हा महामार्ग ५५६.१४ किमी (३४५.५७ मैल) लांबीचा असून तो केंटकी आणि ओहायो राज्यांतून जातो.

मार्ग वर्णन

[संपादन]
राज्यानुसार आय-७१ची लांबी
राज्य लांबी (मैल)
राज्य लांबी (किमी)
केंटकी ९७.४२ १५६.७८
ओहायो २४८.१५ ३९९.३६
एकूण ३४५.५७ ५५६.१४

केंटकी

[संपादन]
लुईव्हिलमधील आय-७१ चे दक्षिणेकडील टोक
कॅरॉल काउंटीमध्ये आय-७१
सिनसिनाटीमध्ये शिरताना आय-७१ आणि आय-७५

केंटकीमध्ये आय-७१ लुईव्हिल शहराच्या मध्यवर्ती भागापासून जवळ सुरू होतो व लगेचच आय-६४ आणि आय-६५ पार करीत कॅरल्टनकडे जातो. १२४ किमी (७७ मैल) या दिशेने गेल्यावर आय-७५ या रस्त्याला मिळतो व हे दोन्ही रस्ते आय-२७५ हा सिनसिनाटी शहराभोवतीचा महामार्ग ओलांडतात. ओहायो नदी पार करून आय-७१ सिनसिनाटी शहरातून पुढे जातो.

ओहायो

[संपादन]

ओहायोत शिरल्यावर सिनसिनाटी शहरात आय-७५ लगेचच वेगळा होतो. शहराच्या मध्यवर्ती भागाच्या पूर्वेस यूएस ५० वेगळा होतो आणि आय-७१ ईशान्येस आय-४७१ पार करून सिनसिनाटी महानगरातून पुढे जातो. येथे आय-२७५ला पुन्हा एकदा पार केल्यावर आय-७१ ग्रामीण भागातून कोलंबसकडे पुढे जातो. साउथ लेबेनॉन शहरानंतर हा रस्ता पूर्वेकडे वळतो व ओहायोच्या सपाट मैदानातून जातो. कोलंबसच्या पूर्वेस आय-२७० या वर्तुळाकृती रस्त्यावरून पुढे आय-७१ ईशान्येस क्लीव्हलंड महानगराकडे जातो. येथे आय-७६शी असलेला तिठा ओलांडून हा रस्ता आय-८०च्या वरून क्लीव्हलंड हॉपकिन्स विमानतळाजवळून आय-४८०ला मिळतो. येथून पुढे आय-२७१ च्या तिठ्यानंतर आय-७१ कायाहोगा काउंटीतून आय-९०शी असलेल्या तिठ्याला संपतो.