इंटरस्टेट ७१
राष्ट्रीय महामार्ग ७१ | |
---|---|
लांबी | ५५६.१४ किमी |
सुरुवात | लुईव्हिल |
मुख्य शहरे | सिनसिनाटी, कोलंबस, रिचफील्ड |
शेवट | क्लीव्हलंड |
जुळणारे प्रमुख महामार्ग | |
राज्ये | केंटकी, ओहायो |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
आय-७१ तथा इंटरस्टेट ७१ हा अमेरिकेतील महामार्ग आहे. देशाच्या साधारण उत्तर-मध्य भागात नैऋत्य-ईशान्य धावणारा हा रस्ता केंटकी राज्यातील लुईव्हिल शहराला ओहायो राज्यातील क्लीव्हलंड शहराला जोडतो.
हा महामार्ग ५५६.१४ किमी (३४५.५७ मैल) लांबीचा असून तो केंटकी आणि ओहायो राज्यांतून जातो.
मार्ग वर्णन
[संपादन]राज्य | लांबी (मैल) | |
---|---|---|
राज्य | लांबी (किमी) | |
केंटकी | ९७.४२ | १५६.७८ |
ओहायो | २४८.१५ | ३९९.३६ |
एकूण | ३४५.५७ | ५५६.१४ |
केंटकी
[संपादन]केंटकीमध्ये आय-७१ लुईव्हिल शहराच्या मध्यवर्ती भागापासून जवळ सुरू होतो व लगेचच आय-६४ आणि आय-६५ पार करीत कॅरल्टनकडे जातो. १२४ किमी (७७ मैल) या दिशेने गेल्यावर आय-७५ या रस्त्याला मिळतो व हे दोन्ही रस्ते आय-२७५ हा सिनसिनाटी शहराभोवतीचा महामार्ग ओलांडतात. ओहायो नदी पार करून आय-७१ सिनसिनाटी शहरातून पुढे जातो.
ओहायो
[संपादन]ओहायोत शिरल्यावर सिनसिनाटी शहरात आय-७५ लगेचच वेगळा होतो. शहराच्या मध्यवर्ती भागाच्या पूर्वेस यूएस ५० वेगळा होतो आणि आय-७१ ईशान्येस आय-४७१ पार करून सिनसिनाटी महानगरातून पुढे जातो. येथे आय-२७५ला पुन्हा एकदा पार केल्यावर आय-७१ ग्रामीण भागातून कोलंबसकडे पुढे जातो. साउथ लेबेनॉन शहरानंतर हा रस्ता पूर्वेकडे वळतो व ओहायोच्या सपाट मैदानातून जातो. कोलंबसच्या पूर्वेस आय-२७० या वर्तुळाकृती रस्त्यावरून पुढे आय-७१ ईशान्येस क्लीव्हलंड महानगराकडे जातो. येथे आय-७६शी असलेला तिठा ओलांडून हा रस्ता आय-८०च्या वरून क्लीव्हलंड हॉपकिन्स विमानतळाजवळून आय-४८०ला मिळतो. येथून पुढे आय-२७१ च्या तिठ्यानंतर आय-७१ कायाहोगा काउंटीतून आय-९०शी असलेल्या तिठ्याला संपतो.