Jump to content

आय−लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एअरटेल आय−लीग
देश भारत ध्वज भारत
मंडळ ए.एफ.सी.
स्थापना २००७
संघांची संख्या १०
देशामधील पातळी सर्वोच्च
खालील पातळी आय−लीग दुय्यम विभाग
राष्ट्रीय चषक फेडरेशन चषक
आंतरराष्ट्रीय चषक ए.एफ.सी. चषक
ए.एफ.सी. चॅंपियन्स लीग
सद्य विजेते बंगळूर एफ.सी. (पहिले)
सर्वाधिक अजिंक्यपदे डेम्पो एस.सी. (३)
संकेतस्थळ i-league.org
२०१५

एअरटेल आय−लीग ही भारत देशामधील प्रमुख फुटबॉल लीग आहे. २००७ साली स्थापन झालेल्या आय−लीगमध्ये सध्याच्या घडीला १० क्लब संघ भाग घेतात.

भारत देशामध्ये व्यावसायिक फुटबॉलची लोकप्रियता वाढावी ह्या उद्देशाने १९९६ साली राष्ट्रीय फुटबॉल लीगची निर्मिती करण्यात आली. परंतु ११ हंगामांनंतर देखील राष्ट्रीय फुटबॉल लीगला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. ह्या कारणास्तव अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने राष्ट्रीय फुटबॉल लीगची पुनर्रचना करण्याचे ठरवले. त्यानुसार २००७ साली ८ संघांसह आय-लीग चालू करण्यात आली. सध्याच्या घडीला आय-लीगमध्ये १० संघ आहेत.

संघांचे भारतामधील स्थान

खालील ११ भारतीय क्लब २०१५ आय-लीग हंगामामध्ये सहभाग घेतील.

संघ शहर राज्य स्तेडियम क्षमता
बंगळूर एफ.सी. बंगळूर कर्नाटक श्री क्रांतिवीर स्टेडियम ४०,०००
भारत एफ.सी. पुणे महाराष्ट्र श्री शिवछत्रपती क्रीडानगरी २२,०००
डेम्पो एस.सी. पणजी गोवा ठरायचे आहे
ईस्ट बंगाल एफ.सी. कोलकाता पश्चिम बंगाल सॉल्ट लेक स्टेडियम ६८,०००
मोहन बागान ए.सी. कोलकाता पश्चिम बंगाल सॉल्ट लेक स्टेडियम ६८,०००
मुंबई एफ.सी. मुंबई महाराष्ट्र कूपरेज मैदान १०,०००
पुणे एफ.सी. पुणे महाराष्ट्र श्री शिवछत्रपती क्रीडानगरी २२,०००
रॉयल वाहिंगडोह एफ.सी. शिलाँग मेघालय जवाहरलाल नेहरू स्टेडियम, शिलाँग ३०,०००
साळगावकर एफ.सी. वास्को द गामा गोवा ठरायचे आहे
शिलाँग लाजोंग एफ.सी. शिलाँग मेघालय जवाहरलाल नेहरू स्टेडियम, शिलाँग ३०,०००
स्पोर्टिंग क्लब दे गोवा पणजी गोवा ठरायचे आहे

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

साचा:आय−लीग