श्री शिवछत्रपती क्रीडानगरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

श्री शिवछत्रपती क्रीडानगरी किंवा म्हाळुंगे- क्रीडा संकुल हे पुणे शहराच्या [मुळशी-हवेली तालुक्यांतील ]] ह्या उपनगरामधील एक मोठे क्रीडा संकुल आहे. १९९४ सालच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी बांधल्या गेलेल्या ह्या बहूपयोगी संकुलामध्ये २००८ सालच्या कॉमनवेल्थ युवा स्पर्धा खेळवण्यात आल्या होत्या. म्हाळुंगे संकुलात २०,००० आसनक्षमतेचे प्रमुख ॲथलेटिक्स स्टेडियम, जलतरण केंद्र, बॅडमिंटन हॉल, टेनिस कोर्ट, बास्केटबॉलव्हॉलीबॉल कोर्ट, मुष्टियुद्ध व कुस्ती रिंगण इत्यादी अनेक खेळांच्या सुविधा आहेत.

८ ऑक्टोबर २०१० रोजी येथे भारतव्हियेतनाम राष्ट्रीय संघांदरम्यान फुटबॉल सामना खेळवला गेला. पुण्यामधील अनेक व्यावसायिक क्लब हे संकुल वापरतात.

व्यावसायिक संघ[संपादन]

क्लब खेळ लीग
एफ.सी. पुणे सिटी फुटबॉल इंडियन सुपर लीग
पुणे एफ.सी. फुटबॉल आय−लीग
पुणेरी पलटण कबड्डी प्रो कबड्डी लीग
पुणे मराठाज अमेरिकन फुटबॉल एलिट फुटबॉल लीग ऑफ इंडिया
पुणे पिस्टन्स बॅडमिंटन भारतीय बॅडमिंटन लीग

गुणक: 18°34′29″N 73°45′40″E / 18.574745°N 73.760984°E / 18.574745; 73.760984