स्थापत्य अभियांत्रिकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हूवर धरण
बुर्ज खलिफा,जगातील सर्वात उंच ईमारत.
आर्किमिडीजच्या सिद्धांतावर आधारीत हातांनी चालवता येण्याजोगे साधे यंत्र. याने खोलातुन पाणी वर आणण्यास सोपे होत असे.

स्थापत्य अभियांत्रिकी ही सर्वात जुनी अभियांत्रिकी शाखा आहे. यात नागरी नियोजन, नागरी अभियांत्रिकी, वास्तुकला , बांधकाम तंत्रज्ञान, आणि बांधलेल्या इमारतींची संरचना व इतर संबंधित नागरी क्षेत्रे इत्यादींचा स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये समावेश होतो. पृथ्वी, जल, आणि त्यांच्या क्रिया यांच्या संबंधित असल्यानेच इंग्रजीत याला सिव्हिल इंजिनिअरिंग असे म्हटले जाते. आजच्या याच्या क्षेत्रात पाणीपुरवठा व मलनिःस्सारण , जल व्यवस्थापन आणि वाहतूक यांचा ही अंतर्भाव होतो. थोडक्यात स्थापत्य अभियांत्रिकी असे क्षेत्र आहे की जे आपल्या विश्वाला, राहत्या जागेला अधिक सुखकर बनवण्यास मदत करते.

स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये खालील प्रमुख शाखांचा समावेश होतो :-

  • नागरी नियोजन
  • नागरी अभियांत्रिकी
  • ग्रामीण अभियांत्रिकी
  • वास्तुकला
  • बांधकाम तंत्रज्ञान
  • वाहतूक अभियांत्रिकी
  • महाराष्ट्रातील कोणताही विद्यार्थी हा (१) नागरी नियोजन (Civil Planning) (२) नागरी अभियांत्रिकी (Civil Engineering) (३) वास्तुकला (Architecture) आणि (४) बांधकाम तंत्रज्ञान (Construction Technology) या समकक्ष / समतुल्य शाखेतील पदवीधारक किंवा पदविकाधारक किंवा पदव्युत्तर पदवीधारक किंवा पदव्युत्तर पदविकाधारक असेल तर तो जिल्हा परिषद मधील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (गट , ब) अराजपत्रित तसेच महाराष्ट्र राज्यस्तरीय जलसंपदा / जलसंधारण आणि लघुपाटबंधारे विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) किंवा स्थापत्य अभियांत्रिकी सहायक. (गट ,ब) अराजपत्रित पदासाठी उमेदवारी ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरू शकतात.

स्थापत्य अभियांत्रिकीचा इतिहास[संपादन]

स्थापत्य अभियांत्रिकी हे भौतिकशास्त्रातील नियमांचे उपयोजन असून याचा इतिहास भौतिकशास्त्र आणि गणिताच्या सखोल अध्यायानाशी संबंध दाखवतो. स्थापत्य अभियांत्रिकी हा भव्य व्यवसाय असल्यामुळे या शाखेचा इतिहास संरचनात्मक अभियांत्रिकी, पदार्थविज्ञान, भूगोल, भूगर्भशास्त्र, मृदा यांत्रिकी, जल विज्ञान, पर्यावरण, उपयोजित यंत्रशास्त्र आदी शाखांशी संबंधित आहे.

पुराणकाळापासून रचना आणि बांधकामाचे बहुतेक कार्य हे शिल्पकार आणि सुतार यांच्यासारख्या कारागिरांनी केले. उत्तरोत्तर काळात चतुर बांधकाम कारागिराची गरज वाढत गेली. बांधकामासंबंधित माहिती आणि तंत्रज्ञान हे अशा कारागिरांच्या संघटनेत जतन केले जात असे, आणि नव्या पिढीला पुरवले जात असे. इमारती, रस्ते आणि इतर बांधकाम हे पुन्हा पुन्हा त्याच पद्दतींनी बांधले जात होते आणि त्यांची मागणी खूप जास्त प्रमाणात वाढत होती.

भौतिकशास्त्रातील आणि गणितातील उदाहरणांचा शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करून त्यांचा स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये वापर करून घेण्याचे पुरातन उदाहरण म्हणजे आर्किमिडीजचे ई.स.पु. तिसऱ्या शतकातले काम ज्यामध्ये आर्किमिडीजच्या सिद्धांताचा, ज्यामुळे आपण उल्हासित वृत्ती समजून घेऊ शकतो तसेच काही समस्यांच्या व्यावहारिक निवारणांचा (उदा. आर्किमिडीजचा स्क्रू-वरील चित्र बघा.) समावेश होतो. ब्रह्मगुप्त या भारतीय गणिततज्ञाने सातव्या शतकात उत्खननाच्या परिमाणाच्या आकडेमोडीसाठी हिंदू-अरेबिक अंकांवर अवलंबून असणाऱ्या अंकगणिताचा वापर केला होता.