वैद्युत संचरण व दूरसंचार अभियांत्रिकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वैद्युत संचरण व दूरसंचार अभियांत्रिकी, यास इंग्लिश भाषा मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन इंजिनीअरिंग (Electronics and Telecommunication Engineering) असे म्हणतात, अभियांत्रिकीची एक प्रमुख शाखा आहे. या शाखेच्या अभ्यासक्रमांतर्गत पायाभूत विद्युतशास्त्रासोबत प्रामुख्याने सूक्ष्मविद्युत पातळीवर चालणाऱ्या उपकरणांचा (उदा. विविध प्रकारचे ट्रांझिस्टर) व यंत्रांचा अभ्यास असतो, तसेच दूरसंचार व दळणवळण शास्त्राच्या वेगवेगळ्या सैद्धांतिक व तांत्रिक बाबी शिकविल्या जातात.