बांधकाम अभियांत्रिकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बांधकाम अभियांत्रिकी ही शाखा महामार्ग, पूल, विमानतळ, रेल्वेमार्ग,धरणेइमारती आणि पाणीसाठे यांचे नियोजनव्यवस्थापन इत्यादींशी संबंधित आहे.अशा प्रकारच्या प्रकल्पांचे बांधकामासाठी अभियांत्रिकीव्यवस्थापनाचे ज्ञान असणे व व्यापाराच्या पद्धती अर्थशास्त्र व मानवी व्यवहार ज्ञात असणे जरुरी आहे.तात्पुरते बांधकाम, दर्जाची खात्री,गुणवत्ता नियंत्रण, इमारत व प्रकल्पक्षेत्राच्या जागेचे सर्वेक्षण व आखणी, बांधकाम सामग्रीची चाचणी, काँक्रिट मिश्रणाचे आरेखन,मूल्य निर्धारण,नियोजन व आराखडा, सुरक्षा अभियांत्रिकी,सामग्री उपलब्ध करणे,अंदाजपत्रक आदी गोष्टींसाठी बांधकाम अभियंत्यांची गरज पडते.

कारकिर्द[संपादन]

बहुतेक सर्व प्रकारच्या व वेगवेगळ्या दर्जांचे शिक्षण घेतलेल्यांना बांधकाम उद्योग हा रोजगार पुरवितो.अमेरिकेच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात या उद्योगाचा वाटा १४ % आहे.बांधकाम अभियांत्रिकी ही प्रकल्प कार्यालय व बांधकाम कार्यालय या दोघांनाही आरेखनाचे पाठबळ देते.एखाद्या प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण करण्यास,बांधकाम अभियंते हे वास्तुविशारद,तसेच इतर बांधकामकर्ते किंवा/व उच्च अभियंत्यांनी तयार केलेल्या आराखडे व मानकांवर अबलंबुन असतात.२०व्या शतकात,बहुतेक सर्व बांधकामे ही प्रथम आरेखित केल्या गेलीत नंतर अभियंत्याची चमू ही त्यावर चाचणी व मानकांनुसार देखरेख करून ते बांधकाम योग्य असल्याची खात्री करते.२०व्या शतकाच्या आधी, २१व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत, बांधकामांच्या उभारण्या ह्या स्थळाच्या स्थितीनुसार व बांधकामाच्या पद्धती याचे मिश्रण करून एकत्रितपणे केल्या जात होत्या.

कार्यक्षेत्र[संपादन]

बांधकाम अभियंत्यास, काम करण्यास विपूल कार्यक्षेत्र आहे.या क्षेत्रात नविन उतरलेले अभियंते हे भूप्रदेशाच्या माहितीचे विश्लेषण करतात.बांधकाम अभियंत्यास संगणक सॉफ्टवेर वापरुन,जलीय प्रणाली व उभारण्या यांचे नियमनानुसार आरेखन करावे लागते.बांधकामक्षेत्र सुरक्षित ठेवणे हे एखादी बांधकाम कंपनी प्रथितयश होण्याची किल्लीच आहे. बांधकाम अभियंत्यांचे हे सुद्धा काम आहे कि सर्व बांधकामे योग्य पद्धतीने व बरोबर होतात की नाहे हे बघणे.सुरक्षेसोबतच,त्यांना हे सुद्धा बघावे लागते कि बांधकाम क्षेत्र हे स्वच्छ व अडथळ्याविना राहील.अनुभवी बांधकाम अभियंते हे पण बघतात कि,प्रकल्पाचे योग्य तर्‍हेने नियोजन होते आहे अथवा नाही.ते प्रकल्पाचे मुल्यवर्धन होउ नये म्हणुन व कामे अंदाजपत्रकाच्या मर्यादेतच रहावीत याकडे लक्ष ठेवतात.तसेच,बांधकामास आवश्यक असणारी माहिती पुरविणे,अशा माहितीच्या विनंत्याकडे लक्ष देणे,काही बदल झाल्यास त्याचे आदेश निर्गमित करणे व पुरवठ्याचे/कामगारांचे देयक देणे इत्यादी कामेही ते करतात.

बांधकाम अभियंत्यास गणित व विज्ञानाचे पुरेपूर व सखोल ज्ञान असणे अभिप्रेत असते. त्याव्यतिरिक्त,अनेक योग्यताही त्यांच्यात असाव्या लागतात.चिंतन,अडथळ्यांवर व समस्यांवर मात करणे,म्हणणे नीट ऐकुन घेणे,शिकणे व अभ्यास,बारीक देखरेख तसेच निर्णयक्षमता हे देखील असावे लागणारे काही गुण आहेत.पुढे येणाऱ्या अडथळ्यांवर सर्वकष विचार करून व ईतर सहकाऱ्यांच्या त्याविषयीच्या कल्पना नीट ऐकुन,त्याचा अभ्यास करून प्रकल्प सुरू होण्याआधी त्याबद्दलची संपूर्ण माहिती सहकाऱ्यांना देणे ही गरज असते.बांधकाम प्रकल्पांचे निर्माणादरम्यान गणितविज्ञानातील त्यांचे ज्ञान वापरुन समोर येणारे अडथळे/समस्या त्यांना सोडवाव्याच लागतात. बांधकाम अभियंत्यांनी,प्रकल्पाच्या कामावरील श्रमिक व उपकरणे/यंत्रे यावर नियंत्रण ठेवणे जरुरी आहे व त्यांनी हे पण बघावयास हवे ही प्रकल्प हा निर्धारीत वेळेत पूर्ण व्हावयास हवा व गुणवत्ता नियंत्रण ही पण त्यातील एक महत्त्वाची बाब आहे.बांधकाम अभियंते त्यांचे समोर उभ्या झालेल्या बांधकामासंबंधी समस्यांची उकल करतात.

क्षमता[संपादन]

बांधकाम अभियंत्यांना त्यांचे काम करण्यास वेगवेगळ्या क्षमता हव्यात.त्यांना कारण देण्याची क्षमता,इतरांसमवेत सुचनांचे आदानप्रदान,बदलती परिस्थिती जाणुन घेणे,समस्या उद्भवण्यापूर्वीच जाणणे,तोंडी, लिखित व आरेखित सुचना समजणे,आकडेवारीचे संच लावणे,स्पष्ट समजेल असे बोलणे,चतुर्थ परिमितीचे काळ-क्षेत्र याचे आकलन करु शकणे व वास्तविक आरेखन व बांधकाम पद्धतीतील प्रकारांचे ज्ञान हे आवश्यक आहे.

शैक्षणिक आवश्यकता[संपादन]

बांधकाम अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम हा अभियांत्रिकी आरेखन , बांधकाम व्यवस्थापनअभियांत्रिकी यंत्रशास्त्र या शाखांसमवेतच,सामान्य विज्ञानगणित या सर्वांची सरमिसळ असतो.स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी ही अभियांत्रिकी व्यवस्थापन, व्यापार प्रशासन या विषयांसह घेता येते.

रोजगाराच्या अपेक्षा[संपादन]

सन २००८पासून,बांधकामांची संख्या कमी झाल्यामुळे,मागणी रोडावली.परंतु सध्या,अभियांत्रिकीच्या स्वयंचलीत यंत्रांमुळे,ती मागणी सध्या वाढत आहे कारण त्यायोगे,वेळ व पैश्याची बचत होते.

हे सुद्धा बघा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  • The Book of Knowledge. (1992). Engineering. In The New Book of Knowledge (Vol. 5, pp. 224–225). Danbury, CT: Grolier Incorporated.