अखिल भारतीय मराठी लोककला संमेलन
Jump to navigation
Jump to search
मुंबईत २४ ते २६ सप्टेंबर २०१० या काळात अखिल भारतीय मराठी लोककला संमेलन झाले होते. या संमेलनाचे चार विभाग आणि त्यामुळे चार अध्यक्ष होते. आदिरंगचे अध्यक्ष आदिवासी बोलीचे संशोधक डॉ.गणेश देवी, भक्तिरंगचे अध्यक्ष ह.भ.प. दादामहाराज मनमाडकर, लोकरंगच्या अध्यक्षा गायिका सुलोचना चव्हाण व लोकसाहित्याचे संशोधक डॉ. प्रभाकर मांडे हे समग्र संमेलनाचे अध्यक्ष होते.
दुसरे अखिल भारतीय महिला लोककला संमेलन २२ व २३ ऑक्टोबर २०१२ला मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे झाले. संमेलनाध्यक्षा माया जाधव होत्या.
याशिवाय एक तीन दिवसांचे अखिल भारतीय लोककला संमेलन कऱ्हाड येथे ११ मे ते १३ मे २०१८ या काळात झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर मांडे होते.