अनुपान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


अनुपान म्हणजे तो पदार्थ , तरल पदार्थ अथवा भुकटी जो औषधासमवेत योजला जातो. यामुळे संबंधीत औषधाचे गुणधर्म वाढतात. ते अधिक प्रभावशाली होते.तसेच ते सेवनास योग्य बनते.त्याची दाहकता (असेल तर) ती कमी होते.आयुर्वेदिक औषध अनुपानात मिसळून घेतले जाते. जाते.क्वचितप्रसंगी, अनुपानाचे सेवन नंतरही करण्यास सांगीतले जाते.

कोणत्याप्रकारची औषधयोजना करण्यात येत आहे त्यावर अनुपान अवलंबून असते.बहुतेक वेळी, पाणी अथवा दूध हे अनुपान म्हणून वापरले जाते. आयुर्वेदिक औषधांच्या बाटल्यांवर अथवा गोळ्यांसमवेत कोणते अनुपान वापरावे याचे निर्देश दिलेले असतात.

साधारणतः, देण्यात येणाऱ्या औषधाच्या समगुणाचे पदार्थ अनुपानास वापरले जातात.