डेंग्यू ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू (DENV)विषाणूंमुळे होतो. एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याव्दारे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसांनंतर मनुष्याला हा रोग होतो. हा रोग दोन प्रकारे होतोः डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप (डीएचएफ). डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरुपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यु ओढवू शकतो.
भारतात इ.स. १९६३ साली कलकत्त्यात याची पहिली मोठी साथ निर्माण झाली. त्यानंतर बहुतांश महानगरे आणि शहरांमधे व ग्रामीण भागांमधेही डेंग्यूचा उद्रेक झाल्याचे वृत्त आहे.
प्रसार
आजारी माणसाच्या रक्तातील डेंग्यू विषाणू ‘एडीस इजिप्ती’ जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुसऱ्या निरोगी व्यक्तीस संक्रमित केले जातात. याच्या साथी वेगाने पसरू शकतात. एडीस इजिप्ती हा एक लहान, काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे ५ मिलीमीटर असतो. हा आपल्या शरीरात विषाणू तयार करायला ७ ते ८ दिवस घेतो आणि नंतर रोगाचा प्रसार करतो.
सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे ब्रिटनचे जीवशास्त्रज्ञ, औषधतज्ञ होते. (जन्म ६ ऑगस्ट १८८१ - म्रुत्यु ११ मार्च १९५५). त्यांनी केलेल्या पेनिसिलीन च्या शोधाबद्दल व त्याचा प्रतिजैविक म्हणून वापराच्या शोधाबद्दल त्यांना १९४५ मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या शोधाने वैद्यकक्षेत्रात प्रतिजैविकांचे युग चालू झाले व त्यामुळे अनेक अवघड जीवघेण्या रोगांवर मात करणे शक्य झाले. त्यांच्या पेनिसिलीनच्या शोधाबद्दल कहाणी प्रसिद्ध आहे. त्यांनी जीवाणूंचे ताटलीमध्ये कल्चर तयार केले होते. या कल्चरमध्ये चूकून पेनिसिलिन नामक बुरशी येउन पडली व त्यामुळे जीवाणूंचे संपूर्ण कल्चर मृत झाले. आपले श्रम वाया गेले म्हणून फ्लेमिंग ती ताटली फेकून देणार होते...
आपण वैद्यकशास्त्र विषयातील रसिक, अभ्यासक, शिक्षक, लेखक अथवा वाचक असल्यास आपले येथे स्वागत आहे. वैद्यकशास्त्रविषयक लेखांच्या विस्तारीकरणाचे व अन्य संबंधित कामांचे सहयोगी पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी विकिपीडिया:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र हा विकिप्रकल्प चालवला जात आहे. या विकिप्रकल्पात सहभागी होऊन आपण अन्य उत्सुक सदस्यांच्या साथीने नवीन लेख तयार करू शकता, तसेच विस्ताराच्या प्रतीक्षेत असलेल्या लेखांमध्ये भर घालू शकता.