जामनगर
जामनगर જામનગર |
|
भारतमधील शहर | |
लुआ(Lua) त्रुटी विभाग:Location_map मध्ये 502 ओळीत: "गुजरात" is not a valid name for a location map definition.जामनगरचे गुजरातमधील स्थान |
|
देश | {{देश माहिती भारत
| देश देशध्वज२ | variant = | size = | नाव= }} |
राज्य | गुजरात |
जिल्हा | जामनगर जिल्हा |
स्थापना वर्ष | इ.स. १५४० |
क्षेत्रफळ | १२२ चौ. किमी (४७ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ५६ फूट (१७ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ४,७९,९२० |
- महानगर | ६,००,९४३ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
अधिकृत संकेतस्थळ |
जामनगर (गुजराती: જામનગર) हे भारताच्या गुजरात राज्यामधील एक प्रमुख शहर आहे. जामनगर शहर गुजरातच्या सौराष्ट्र भागात कच्छच्या आखाताच्या किनाऱ्याच्या जवळच वसले असून ते राजधानी गांधीनगरपासून ३२० किमी अंतरावर स्थित आहे. २०११ साली ४.८ लाख लोकसंख्या असणारे जामनगर अहमदाबाद, सुरत, वडोदरा व राजकोट खालोखाल गुजरातमधील पाचव्या क्रमांकाचे तर भारतामधील २६व्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. जामनगर गुजरातमधील सर्वात प्रगत व औद्योगिक शहरांपैकी एक मानले जाते. येथील रिलायन्स ह्या भारतामधील आघाडीच्या कंपनीचा खनिज तेल शुद्धीकरण कारखाना (रिफायनरी) जगातील सर्वात मोठा कारखाना मानला जातो.
इ.स. १५४० साली स्थापन झालेले जामनगर सौराष्ट्राच्या नवानगर ह्या संस्थानाचा भाग होते. नवानगरचे युवराज व प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू रणजितसिंहजी ह्यांनी जामनगरचा खऱ्या अर्थाने विकास घडवला.
जामनगर विमानतळ सध्या भारतीय वायुसेनेच्या ताब्यात असून येथे एर इंडियातर्फे मुंबईहून प्रवासी विमानसेवा चालवली जाते. जामनगर रेल्वे स्थानकामधून सौराष्ट्र एक्सप्रेस, सौराष्ट्र मेल इत्यादी अनेक गाड्या सुटतात.
बाह्य दुवे
[संपादन]- विकिव्हॉयेज वरील जामनगर पर्यटन गाईड (इंग्रजी)