Jump to content

संतोष शेणई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गणेश सूर्यकांत तथा संतोष शेणई (जन्म: १९६६) पत्रकार, कवी, अनुवादक, लेखक, प्राध्यापक, संपादक

संतोष शेणई

शिक्षण

[संपादन]

एम. ए. (मराठी). पुणे विद्यापीठ, १९८९

भाषा-अभ्यास

[संपादन]

शेणई यांचा लोकभाषालोकसाहित्य यांचा विशेष अभ्यास आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणीरायगड जिल्ह्यातील नॉलिंग या लोकभाषांचा अभ्यास त्यांनी केला आहे.[]

पत्रकारिता आणि अध्यापन

[संपादन]

वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथून केसरी या दैनिकासाठी तालुका वार्ताहर म्हणून पत्रकारितेस सुरुवात झाली. पुढे ते सकाळ येथे वार्ताहर म्हणून कार्यरत होते. सकाळमध्ये रविवार पुरवणीचे संपादन, `फॅमिली डॉक्टर` पुरवणीचे संपादन [], `सकाळ` पुस्तक प्रकाशन विभाग प्रमुख (संपादन, निर्मिती, वितरण), `तनिष्का` (स्त्रियांसाठीचे मासिक, संपादन, दिवाळी २०१९ ते जून २०२०), `साम टिव्ही`साठी डॉक्युमेंटरी लेखन इत्यादी विविध स्वरूपाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ. संभाजीनगर (औरंगाबाद), टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (पुणे), यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (नाशिक) येथे पत्रकारिता या विषयाचे त्यांनी अध्यापन केले आहे.

मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथील पत्रकारिता पदव्युत्तर विभाग संचालक म्हणून कार्यरत आहेत. []

संस्थात्मक कार्य   

[संपादन]

लेखन आणि संपादन

[संपादन]

लेखन

[संपादन]
  • घटकापळाने (कवितासंग्रह) - हिंदी, पंजाबी, राजस्थानी, मल्याळम आणि इंग्रजी या भाषांमध्ये या कवितासंग्रहातील काही कवितांचे अनुवाद झाले आहेत. []
  • ओबेसिटी मंत्रा (सहलेखक)

अनुवाद

[संपादन]
  • सुशीलकुमार शिंदे - एका संघर्षाची वाटचाल’ (चरित्रग्रंथ) अनुवादक: संतोष शेणई, प्रकाशक: अमेय प्रकाशन. (मूळ इंग्रजी पुस्तक-हू रोट माय डेस्टिनी, लेखक: डॉ.पी.आर.सुबास चंद्रन)
  • `माझे आरोग्यस्वास्थ्याचे प्रयोग` (महात्मा गांधीजींच्या आरोग्यविषयक लेखांचा अनुवाद)
  • `रेडिएन्ट डेस्टिनी` (डॉ. अरुण किनरे यांच्या पुस्तकाचा अनुवाद)

संपादन

[संपादन]

मालिका व लघुपट

[संपादन]
  • त्यांनी दूरदर्शनसाठी `संस्कृती एक्स्प्रेस` या मालिकेचे लेखन केले आहे.
  • साम टीव्हीसाठी आयुर्वेद, संस्कृती व ग्रामीण जीवनासंबंधीच्या सात लघुपटांचे लेखन त्यांनी केले आहे.

अभ्यासवृत्ती

[संपादन]

पुरस्कार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b मराठी भाषा - संचित आणि नव्या दिशा, संपादक - विजय कुवळेकर
  2. ^ "संतोष शेणई". Esakal Marathi News. 2020-10-31. 2024-03-30 रोजी पाहिले.
  3. ^ "संतोष शेणई | थिंक महाराष्ट्र" (इंग्रजी भाषेत). 2022-12-18. 2024-03-21 रोजी पाहिले.
  4. ^ घटकापळाने, संतोष शेणई
  5. ^ उपयोजित मराठी (डॉ.गं.ना.जोगळेकर कृतज्ञताग्रंथ)
  6. ^ "पुरस्कार विजेत्या मराठी कवींची यादी". विकिपीडिया. 2019-05-31.