सुजाता शेणई
सुजाता शेणई (जन्म १९६७) या मराठी विषयाच्या प्राध्यापिका, लेखिका, सूत्रसंचालक आहेत.
शिक्षण
[संपादन]शेणई या एम.ए (मराठी) आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या साहित्य विशारद परीक्षेत त्या महाराष्ट्रात प्रथम आलेल्या होत्या.
त्यांनी पीएच.डी पदवी संपादन केली आहे. 'सुर्वे, महानोर, व ग्रेस यांची कविता - विशेष अध्ययन' हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. [१] समीक्षक डॉ. रेखा इनामदार-साने यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
अध्यापन
[संपादन]शेणई या मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथे अध्यापन करतात.
अभ्यासमंडळ
[संपादन]त्या इयत्ता अकरावी व बारावी - महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ येथे मराठी विषयाच्या अभ्यासमंडळावर कार्यरत होत्या.
उपक्रम
[संपादन]इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, अन्य पाच प्राध्यापकांच्या समवेत, ओंजळ या ऍपची निर्मिती केली. त्यास राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत पारितोषिक मिळाले.
पारितोषिके व पुरस्कार
[संपादन]बी.ए.ला पुणे विद्यापीठात मराठी विषयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यामुळे विद्यापीठाचे सुवर्णपदक त्यांना मिळाले आहे.
खालील संस्थांतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे.
- पुणे महानगरपालिका
- रोटरी क्लब
- लायन्स क्लब
- साहित्यदीप प्रतिष्ठान
लेखन व संपादन
[संपादन]पुस्तके
[संपादन]- उपयोजित मराठी (डॉ.गं.ना.जोगळेकर कृतज्ञताग्रंथ)
- पद्माक्षरे
- संशोधन:स्वरूप आणि व्याप्ती
या तीन पुस्तकांमध्ये त्यांनी लेखन केले आहे व या तिन्ही पुस्तकांचे सह-संपादनही केले आहे.[२]
लेखन
[संपादन]त्या विविध नियतकालिकामधून स्फुट लेखन करत असतात.[३]
लेखमाला
[संपादन]मिळून साऱ्याजणी या मासिकामध्ये मराठी कवयित्रींच्या कवितेचा समीक्षात्मक वेध घेणारी सुजाता शेणई लिखित 'अक्षर अक्षर वेचू' ही लेखमाला प्रकाशित झाली होती.
संदर्भ
[संपादन]- ^ आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश, खंड ११, नाट्य खंड, संपादक - डॉ.विलास खोले.
- ^ उपयोजित मराठी (डॉ.गं.ना.जोगळेकर कृतज्ञताग्रंथ)
- ^ "आयुष्याची रंगीत गोधडी". Maharashtra Times. 2024-03-13 रोजी पाहिले.