पद्मगंधा प्रकाशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पद्मगंधा प्रकाशन ही मराठीतील एक ग्रंथप्रकाशन संस्था आहे. अरुण जाखडे हे या संस्थेचे प्रमुख असून गणेश देवी, रा.चिं. ढेरे, द.भि. कुलकर्णी अशा मराठीतील अनेक लेखक-संशोधकांचे ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केले आहेत.