विकिपीडिया:मराठी शुद्धलेखन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख सध्या अपूर्ण स्वरूपात आहे आणि तो लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.


शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे. म्हणजेच प्रमाणलेखन. शुद्धलेखनाचा विचार करताना साधारणतः तीन मुद्दे डोळ्यासमोर येतात. खाली दिलेल्या पहिल्या आणि तिसऱ्या मुद्द्यांचे पालन करून शुद्धलेखन सवयीने येते. परंतु दुसरा मुद्दा मात्र भाषेच्या व तिच्या व्याकरणाशी संबधित आहे. त्यामुळे त्या मुद्द्याचे पालन भाषेचे चांगले ज्ञान असल्याखेरीज करता येणे अवघड आहे. अधिक माहिती मराठी व्याकरण या लेखात दिली आहे.पुढे वाचा

१. प्रत्येक शब्दातील अक्षरांची निवड आणि त्यांचा परस्परानुक्रम (यामध्ये स्वर आणि/किंवा त्यांची चिन्हेदेखील येतात)पुढे वाचा
२. शब्दांपासून योग्य तो काळ वापरून व योग्य शब्दरचना करून व्याकरणशुद्ध वाक्ये बनवणे. पुढे वाचा.
३. तसेच कोणत्याही दोन वाक्यांचा, दोन परिच्छेदांचा किंवा दोन प्रकरणांचा तार्किकदृष्ट्या मेळ असणे. पुढे वाचा.
४. अशुद्धलेखनाचे शुद्धीकरण कसे करावे अथवा करवून घ्यावे या संबधीचा प्रकल्प येथे वाचा.
५.मराठी विकिपीडियात अशुद्धलेखन का आढळते? येथे वाचा.

साधारणतः होणाऱ्या चुका[संपादन]

शब्दांचे लेखनरूप लिहिले जात असताना साधारणतः होणाऱ्या चुका या ऱ्हस्व/दीर्घ वेलांटी, उकार या लिपिचिन्हांच्या बाबतीत होतात. अशा प्रकारच्या चुका टाळण्यासाठी शुद्धलेखनाचे नियम बनविण्यात आले आहेत. शालेय अभ्यासक्रमात शिकविले जाणारे मो.रा.वाळिंबे यांच्या पुस्तकातील शुद्धलेखनाचे नियम तसेच महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेले 'शुद्धलेखनाचे नियम' यांच्या संदर्भावरून लिहिलेले शुद्धलेखनाचे नियम पाहावेत. वरील दोन संदर्भग्रंथ वापरून उद्‌धृत केलेले शुद्धलेखनाचे नियम मनोगतमायबोली येथे उपलब्ध आहेत.

या खेरीज अरुण फडके यांचे 'शुद्धलेखन ठेवा खिशात' हे पुस्तकही उपयुक्त आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेची सुगम मराठी शुद्धलेखन (लेखक - श्री माधव राजगुरू) ही पुस्तिका महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर मोफत उपलब्ध आहे. [१] ह्या पुस्तिकेत फार सोपेपणाने शुद्धलेखनाचे नियम समजावण्यात आले आहेत. तेव्हा शुद्धलेखन सुधारण्यासाठी ह्या पुस्तिकेचा निश्चित उपयोग होईल. [२]

पहिल्या मुद्द्यासाठी[संपादन]

शिक्षणशास्त्रातील 'उदाहरणातून शिक्षण' (Learning By Example) ही पद्धत वापरण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार जमतील तेवढ्या शब्दांचे मराठीतील योग्य वर्णविन्यास (Spelling) लिहिले जाईल. परंतु लवकरच ही सर्व माहिती विक्शनरी प्रकल्पाकडे स्थानांतरित केली जावी.

शुद्धलेखनाचे नियम[संपादन]

विस्तृत लेख

शीघ्र संदर्भ[संपादन]

स्वर[संपादन]

- - - - - - - - - - लृ - लॄ - - - - - अं - अः

आणि या इंग्रजी भाषेतील दोन स्वरांचा मराठी भाषेत अलीकडच्या काळात समावेश केला गेला आहे.

व्यंजन[संपादन]

क वर्ग -        
च वर्ग -     
ट वर्ग -     
त वर्ग -     
प वर्ग -     
य वर्ग -          क्ष ज्ञ

मुळाक्षर अ[संपादन]

वर

अडविणे अडवणूक

मुळाक्षर क[संपादन]

वर

किरण उदा. सूर्यकिरण

मुळाक्षर प[संपादन]

वर

पूर्व

मुळाक्षर भ[संपादन]

वर

भरपूर भावी भूक

मुळाक्षर म[संपादन]

वर

माहिती उदा. मूळ उदा. झाडाची मुळे मौसमी

मुळाक्षर र[संपादन]

वर

रूप उदा. स्वरूप

मुळाक्षर स[संपादन]

वर

सुगम सुगरण सुंदर सुरक्षित सुलभ सुवासिक सूर्य उदा. सूर्यप्रकाश

फायरफॉक्समध्ये शुद्धलेखन चिकित्सा[संपादन]

फायरफॉक्समध्ये शुद्धलेखन कसे तपासायचे ते पाहू या. फायरफॉक्स वापरत असाल तर खालील पानावर जाऊन मराठी डिक्शनरीचे ॲड-ऑन जोडून घ्या. इंटरनेट एक्स्पोअर वापरणाऱ्यांसाठी अशी सुविधा आहे की नाही ते माहीत नाही.

https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/12797/

फायरफॉक्स पुन्हा सुरू करा. आता चुकीचे मराठी शब्द लाल रंगात दिसू लागतील. त्या शब्दांवर राईट क्लिक करून योग्य शब्द निवडता येईल. माऊसने उजवी टिचकी मारून "चेक स्पेलिंग"च्या पुढ्यात बरोबरची खूण दिसते आहे याची खात्री करून घ्या. तसेच लॅग्वेजेस या पर्यायात आता मराठी दिसू लागले पाहिजे आणि त्या पर्यायावर क्लिक केले की त्याच्यापुढे बरोबरची खूण येईल.

एखादा शब्द बरोबर असून लाल रंगात अधोरेखित होत असेल तर तो शब्द आपण आपल्या व्यक्तिगत संग्रहात "ॲड टू डिक्शनरी" हा पर्याय वापरून जमा करून ठेवू शकता.

डिक्शनरीने चुकीचा शब्द सुचविला तर त्याचा अर्थ मूळ स्रोत सुधारायला हवा.या दुव्यावर कोणता शब्द डिक्शनरीत नको ते नोंदवा म्हणजे पुढील आवृत्तीत सुधारणा करता येईल. सध्याच्या आवृत्तीत सुधारणेस बराच वाव आहे याची नोंद घ्यावी.

(वरील मजकुराची शुद्धलेखन चिकित्सा फायरफॉक्स मधील हेच एक्सटेन्शन वापरून केलेली आहे.)[३]

शुद्धलेखनाचे संकेत दुवे[संपादन]

  1. विकिपीडिया चर्चा:शीर्षकलेखन संकेत
  2. विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत
  3. विकिपीडिया:लेखनभाषा संकेत
  4. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पुरस्कृत शुद्धलेखनाचे नियम#नियम १४: "कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतल्या उच्चाराप्रमाणे लेखन करावे." उदाहरणार्थ : 'डिक्शनरी, ब्रिटिश, हाऊस.
  5. भाषा सल्लागार मंडळाची परिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्त्वे#विशेषनामे व त्या नामांवरून घेतलेल्या संज्ञा : मूळ भाषेतील त्यांच्या उच्चारानुरूप लिहाव्यात जसे -फॅरनहाईट श्रेणी(फॅरनहाईट), व्होल्टमीटर(व्होल्ट), ॲंपियर.
  6. आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती
  7. विकिपीडिया:आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती भारतीयीकरण
  8. व्यक्तिनामाबद्दलची धोरणे
  9. मराठी भाषेतील अक्षरे इतर भाषांत वापरणे
  10. परिभाषिक शब्द आणि प्रतिशब्दांसंबंधी सूचना
  11. पारिभाषिक शब्द, इ.

हेसुद्धा पाहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

शुद्धिचिकित्सक[संपादन]

मराठी शब्दकोश[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ सुगम मराठी शुद्धलेखन पुस्तिका - संकेत स्थळ- https://www.masapapune.org/books
  2. ^ सुगम मराठी शुद्धलेखन पुस्तिका - pdf https://docs.wixstatic.com/ugd/2ed2e7_2a31a401412d4811ae2987b4e2219d3c.pdf
  3. ^ [१]सदस्य:शंतनुओक