गौतमी देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गौतमी देशपांडे
जन्म ३१ जानेवारी, १९९३ (1993-01-31) (वय: ३१)
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, ​गायन
कारकीर्दीचा काळ २०१८ - चालू
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम माझा होशील ना, सारे तुझ्याचसाठी
वडील विवेक देशपांडे
आई प्रतिभा देशपांडे

गौतमी देशपांडे (जन्म: ३१ जानेवारी १९९३) ही मराठी अभिनेत्री आणि गायिका आहे. ही मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची सख्खी बहीण आहे.[१] माझा होशील ना या झी मराठी वाहिनी वरील मालिकेतील सई या प्रमुख भूमिकेत तिने काम केले. विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे यांची आदित्य-सई ही जोडी २०२०-२०२१ साली टेलिव्हिजन वर अत्यंत गाजली. [२]

शिक्षण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी[संपादन]

गौतमीचा जन्म पुण्यात ३१ जानेवारी १९९३ साली झाला[३]. प्रतिभा आणि विवेक देशपांडे यांची ती धाकटी कन्या होय. अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची ती सख्खी धाकटी बहीण होय[४]. तिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण रेणुका स्वरूप शाळेतून झाले. २०१४ साली मेकॅनिकल इंजिनीरिंग मध्ये VIIT कॉलेज मधून तिने पदवी घेतली. अभिनय क्षेत्रात यायच्या आधी २०१४ ते २०१७ सालापर्यंत तिने सिमेन्स या कंपनीत Package Engineer पदावर काम केले[५].

अभिनय कारकीर्द[संपादन]

गौतमीने आपल्या अभिनय कारकिर्दीला पुण्यात असताना सुरुवात केली. शाळा, कॉलेज मध्ये आणि जॉब करत असताना तिने प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर काम केले[६]. ​फिरोदिया करंडक आणि पुरुषोत्तम करंडक या नाट्यविश्वातल्या नावाजलेल्या नाट्यस्पर्धांमधून तिने काम केले आहे. २०१८ साली आपला इंजिनीरिंग चा जॉब सोडून गौतमीने पूर्णपणे अभिनयात पाऊल टाकले. सोनी मराठी वरील सारे तुझ्याचसाठी या मालिकेतून तिने TV वर पदार्पण केले. बॉक्सर असलेल्या श्रुती नगरकर ची भूमिका या मालिकेतून केली. हर्षद अतकरी ( मालिकेतील कार्तिक दर्शने) याबरोबर गौतमी ची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. २०२० साली झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेत सई बिराजदार च्या भूमिकेत गौतमी झळकली. श्रीमंत वडिलांची एकुलती एक मुलगी जेव्हा एका मध्यमवर्गीय मोठ्या कुटुंबातील मुलाच्या प्रेमात पडते तेव्हा ती या आयुष्याच्या वळणाला कसे स्वीकारते? आपल्या अत्यंत धीट, प्रेमळ, लाघवी पण प्रसंगी बंडखोर स्वभावाने आसपासच्या आणि घरातल्या सर्वांचे आयुष्य कसे बदलवून टाकते? याचं अप्रतिम दर्शन गौतमीच्या अभिनयातून दिसले. गौतमी आणि विराजसच्या जोडीने २०२०-२१ सालात मालिका विश्वात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. आतापर्यंत केलेल्या कामाची पावती गौतमीला मिळालेल्या पुरस्कारांमधून दिसते. तिच्या दोन्ही मालिकांमध्ये केलेल्या कामाबद्दल तिला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री च्या पुरस्काराने गौरवले गेले[७][८].

देशपांडे अभिनयाबरोबरच गायनही करते.[९]. माझा होशील ना मालिकेत देखील तिने ३ गाणी गायली आहेत. "शतजन्म शोधिताना" या यूट्यूब वरील सिरीज मध्ये देखील ती गायली आहे[१०]. D'verb Experience ने या सिरीजची सहनिर्मिती केली आहे तसेच D'verb experience चे संस्थापक देवेंद्र भोमे यांनी अनेक दिग्गजांची गाणी या सिरीज मधून पुन्हा एकदा नव्या रूपात भेटीस आणली."आम्ही दुनियेचे राजे" हा सांगीतिक कार्यक्रमसुद्धा गौतमी करते [११]त्यानिमित्ताने महाराष्ट्रात आणि बाहेर त्याचे दौरे करते.

कारकीर्द[संपादन]

वर्ष शीर्षक भूमिका वाहिनी
२०१८-२०१९ सारे तुझ्याचसाठी श्रुती सोनी मराठी[१२]
२०२० माझा होशील ना सई कश्यप-देसाई झी मराठी[१३]
२०२२ किचन कल्लाकार पाहुणी झी मराठी

पुरस्कार[संपादन]

वर्ष पुरस्कार श्रेणी मालिका भूमिका
२०१९ म. टा. सन्मान सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सारे तुझ्याचसाठी श्रुती
२०२१ झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार सर्वोत्कृष्ट नायिका माझा होशील ना सई कश्यप
सर्वोत्कृष्ट जोडी

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'माझा होशील ना'मधील विराजस आहे या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा तर गौतमीची बहीणदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री". दिव्य मराठी. 2020-02-20. 2021-06-18 रोजी पाहिले.
  2. ^ "Gautami Deshpande shares about her chemistry with her co-actor Virajas Kulkarni". The Times of India (इंग्रजी भाषेत).
  3. ^ "Gautami Deshpande and Virajas Kulkarni Interview". Youtube.
  4. ^ "Mrunmayee, Gautami and Mrs Pratibha Deshpande Interview".
  5. ^ "Gautami Deshpande LinkedIn profile".
  6. ^ "गाण्यासाठी ठरवून वेळ काढावा लागतो, अभिनेत्रीने व्यक्त केली मनातली खंत".
  7. ^ "मटा सन्मान २०१९: लेथ जोशी चित्रपटाची बाजी". Maharashtra Times. 2022-12-01 रोजी पाहिले.
  8. ^ "Zee Marathi Awards 2021: Gautami Deshpande Aka Sai Pens Down An Emotional Note After Getting Applauded At The Ceremony - Zee5 News". ZEE5 (इंग्रजी भाषेत). 2021-04-05. 2022-12-01 रोजी पाहिले.
  9. ^ "गाण्यासाठी ठरवून वेळ काढावा लागतो, अभिनेत्रीने व्यक्त केली मनातली खंत". Maharashtra Times. 2022-12-01 रोजी पाहिले.
  10. ^ "मधु मागशि | RE-MASTERED AUDIO | Shatajanma Shodhatana".
  11. ^ "'आम्ही दुनियेचे राजे'".
  12. ^ Staff, Editorial (2018-09-24). "Sare Tujhyachsathi - Sony Marathi Serial". MarathiStars (इंग्रजी भाषेत). 2022-12-01 रोजी पाहिले.
  13. ^ "'माझा होशील ना' मालिकेतील अभिनेत्री गौतमी देशपांडेबद्दल हे माहित्येय का?". महाराष्ट्र टाइम्स. 2021-06-18 रोजी पाहिले.