कृष्णा गाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कृष्णा गोवंश
कृष्णा गाय
मूळ देश भारत
आढळस्थान महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि सोलापूर तसेच कर्नाटकातील बेळगाव, बिजापूर आणि रायचूर जिल्ह्य
मानक agris-IS
उपयोग शेतीकाम
वैशिष्ट्य
वजन
  • बैल:
    ३२५–२८१ किलो (७२०–६२० पौंड)
  • गाय:
    २८०–२४१ किलो (६२०–५३० पौंड)
उंची
  • बैल:
    ca. 122 सेंमी
  • गाय:
    ca. 118 सेंमी
राखाडी व पांढरा रंग
आयुर्मान २५ वर्ष
डोके कपाळावर ठळक दिसणारा उंचवटा

कृष्णा गाय हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि सोलापूर तसेच कर्नाटकातील बेळगाव, बिजापूर आणि रायचूर जिल्ह्यांत प्रामुख्याने आढळतो. याची निर्मिती अंदाजे इ. स. १८८०नंतर झाल्याचे मानले जाते. कृष्णाखोऱ्यातील चिकट आणि चिवट जमिनीच्या मशागतीसाठी तत्कालीन मराठा राजांनी गीर, कांकरेज आणि ओंगल या भारतीय गोवंशाच्या देशी संकर आणि निवड पद्धतीने या गोवंशाच्या निर्मितीला प्रोत्साहन दिले.[१] हा गोवंश अमेरिकेतील ब्राह्मण गायीच्या निर्मितीसाठी वापरण्यात आलेल्या भारतीय गोवंशापैकी एक आहे.

शारीरिक रचना[संपादन]

सामान्यत: ही प्रजाती राखाडी रंगाची असते. प्रौढ गायी या जास्त पांढऱ्या रंगाच्या असतात. या गायीची सरासरी उंची १२२ सें.मी., लांबी १३२ सें.मी., घेर १६८ सें.मी. असतो. सरासरी वजन ३२५ किलो असते. शिंगे वळणदार असतात. कपाळावर ठळक दिसणारा उंचवटा असतो.[२]

वापर[संपादन]

शेतीशी संबंधित विविध कामांसाठी या गायीचा वापर केला जातो.[३]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Valerie Porter, Lawrence Alderson, Stephen J.G. Hall, D. Phillip Sponenberg (2016). Wallingford: CABI. Mason's World Encyclopedia of Livestock Breeds and Breeding, (sixth edition). ISBN 9781780647944..
  2. ^ "Krishna Valley". National Dairy Development Board. ५ जानेवारी २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "Welcome to Vishwa Gou Sammelana". web.archive.org. 2015-07-06. Archived from the original on 2015-07-06. 2021-01-05 रोजी पाहिले.