केप टाउन आंतरराष्ट्रीय विमानतळ
केप टाउन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: CPT, आप्रविको: FACT) हा दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या मध्यवर्ती भागापासून २० किमी आग्नेयेस आहे. हा दक्षिण आफ्रिकेतील दुसऱ्या तर आफ्रिकेतील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. केप टाउन-जोहान्सबर्ग हा मार्ग जगातील नवव्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा मार्ग आहे. २०११मध्ये ४५ लाख प्रवाशांनी या मार्गावर प्रवास केला होता. केप टाउन पासून दक्षिण आफ्रिकेतील बव्हंश शहरांना तसेच आफ्रिका, आशिया आणि युरोपमधील प्रमुख शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे.
इतिहास
[संपादन]केप टाउन विमानतळ १९५४मध्ये प्रवाशांसाठी खुला झाला. त्यावेळी याला तत्कालीन पंतप्रधान डी.एफ. मलानचे नाव देण्यात आले होते. तेव्हा येथून एक थेट लंडन तर दुसरी जोहान्सबर्गमार्गे लंडन अशा दोन आंतरराष्ट्रीय विमानसेवा होत्या.[१] १९९० च्या सुमारास दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद संपुष्टात आल्यावर या विमानतळाची मालकी सरकारकडून नव्याने उभारलेल्या एरपोर्ट्स कंपनी ऑफ साउथ आफ्रिकाकडे हस्तांतरित झाली[२] व विमानतळाचे नाव राजकीयदृष्ट्या तटस्थ असे केप टाउन आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यात आले.[३] या विमानतळावरून २००-४-५मध्ये ६२ लाख, २००७-०८मध्ये ८४ लाख तर २००८-०९मध्ये ७८ लाख प्रवाशांनी ये-जा केली. २०१६मध्ये १ कोटीपेक्षा जास्त प्रवाशांनी या विमानतळाचा उपयोग केला.
२०१० फिफा विश्वचषकाच्या निमित्ताने या विमानतळाचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला. त्यावेळी १.६ अब्ज रॅंड[४] खर्च करून आंतरराष्ट्रीय आणि अंतर्देशीय टर्मिनलांना जोडणारे मध्य टर्मिनल उभारण्यात आले. २०१८ च्या शेवटी येथे दुसरी धावपट्टी बांधणे सुरू होईल.
विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने
[संपादन]- नोंदी
- ^1 व्हिक्टोरिया/लिविंग्स्टन येथे थांबा.
- ^2 किगालीला ये-जा करणारी सेवा हरारे येथे थांबते. हरारे आणि केप टाउन दरम्यान प्रवाशांची ने-आण करण्यास मुभा आहे.
- ^3 जोहान्सबर्गमध्ये थांबा परंतु केप टाउन-जोहान्सबर्ग प्रवाशांना चढ-उतर करण्यास मनाई.
- ^4 : हे विमान पुढे ऑरेन्यामुंड पर्यंत जाते परंतु केप टाउन पासूनचे थेट प्रवासी नेता येत नाहीत.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ बिकफर्ड-स्मिथ, विव्हियन; E. Van Heyningen; Nigel Worden. Cape Town in the twentieth century: an illustrated social history. Cape Town. pp. १२०. 28 December 2009 रोजी पाहिले.
- ^ "ACSA – History". Airports Company South Africa. 20 July 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 December 2009 रोजी पाहिले. Unknown parameter
|deadurl=
ignored (सहाय्य) - ^ "Cape Town Airport (CPT) Information – Airports Guide to Cape Town". 28 December 2009 रोजी पाहिले.
- ^ निकोल्सन, झारा (8 November 2009). "New terminal hailed as a success". Sunday Argus. IOL. 28 December 2009 रोजी पाहिले.
- ^ http://www.traveller24.com/News/Flights/update-air-botswana-pulls-cape-town-route-on-the-back-of-cemair-grounding-20180216
- ^ http://www.heraldlive.co.za/news/2017/12/02/cape-town-voted-worlds-best-city/
- ^ http://www.traveller24.com/News/Flights/airlink-suspends-pretoria-to-cape-town-service-20180306
- ^ http://www.routesonline.com/news/38/airlineroute/273685/austrian-resumes-cape-town-service-from-oct-2018/
- ^ Cathay Pacific to fly non-stop to Cape Town from November
- ^ http://www.routesonline.com/news/38/airlineroute/272735/cemair-adds-hoedspruit-service-from-august-2017/
- ^ https://www.eurowings.com/en/booking/offers/flights-from/ZA/CPT/to/DE/CGN.html
- ^ http://www.routesonline.com/news/38/airlineroute/271958/eurowings-plans-cape-town-launch-from-nov-2017/
- ^ http://www.aero.de/news-28718/Eurowings-legt-Langstreckenziele-ab-Duesseldorf-fest.html
- ^ https://www.routesonline.com/news/38/airlineroute/276180/joon-s18-expansion-as-of-12dec17/?highlight=cape%20town
- ^ https://www.routesonline.com/news/38/airlineroute/277172/rwandair-adds-new-african-destinations-in-2q18/
- ^ https://www.routesonline.com/news/38/airlineroute/270885/thomas-cook-schedules-manchester-cape-town-jan-2018-launch/
- ^ https://www.routesonline.com/news/38/airlineroute/277454/westair-aviation-outlines-preliminary-scheduled-service-from-april-2018/