Jump to content

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सोलापूर विद्यापीठ या पानावरून पुनर्निर्देशित)
सोलापूर विद्यापीठ
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
सोलापूर विद्यापीठ
ब्रीदवाक्य "विद्यया संपन्नता"
Type शासकीय शैक्षणिक आस्थापना
स्थापना इ.स. २००४
विद्यार्थी ६५,०००
संकेतस्थळ http://su.digitaluniversity.ac/



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, जूने नाव सोलापूर विद्यापीठ, हे महाराष्ट्रातील सोलापूर मधील विद्यापीठ आहे. सोलापूर जिल्हा या एकमेव जिल्ह्यासाठी स्थापन झालेले विद्यापीठ आहे. हा जिल्हा यापूर्वी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या अंतर्गत होता.

इतिहास

[संपादन]

सोलापूर विद्यापीठाची स्थापना १ ऑगस्ट २००४ रोजी झाली आणि त्याचे उद्‌घाटन ३ ऑगस्ट २००४ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल मोहम्मद फजल यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यापीठाचे मूळ नाव "सोलापूर विद्यापीठ" असे होते. हिंदीचे प्राध्यापक असलेले इरेश स्वामी हे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. हे विद्यापीठ डिजिटल युनिव्हर्सिटी आहे, असे म्हणतात.

राणी अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सोलापूर विद्यापीठास द्यावे, ही मागणी महाराष्ट्रातील धनगर समाजाकडून केली जात होती. ६ मार्च २०१९ रोजी विद्यापीठाला त्यांचे नाव दिले, आणि सोलापूर विद्यापीठाचा 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ' असा नामविस्तार झाला.[]

अहिल्यादेवींचे नाव 'देवी अहिल्या विश्वविद्यालय' या इंदूरमधील एका विद्यापीठालाही दिलेले आहे.[]

संकुल

[संपादन]

विद्यापीठात सामाजिक शास्त्रे, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र, पर्यावरणशास्त्र, शिक्षणशास्त्र, व गणितशास्त्र असे एकूण सहा संकुल आहेत.

पत्रकारिता शिक्षण

[संपादन]

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्र विभागात जनसंज्ञापन (पत्रकारिता) हा विषयही शिकवला जातो. याचा अभ्यासक्रम चार सत्रांचा असून डॉक्टर रवींद्र चिंचोलकर हे या जनसंज्ञापन विभागाचे प्रमुख आहेत. या अभ्यासक्रमासाठी असणारे सर्व अध्ययनसाहित्य विद्यापीठाच्या ग्रंथालयात हिंदी आणि इंग्रजीत उपलब्ध आहे. पत्रकारिता विभागातील विद्यार्थ्यांसाठी एका स्वतंत्र मीडिया लॅबमध्ये आंतरजालजोडणी सहित संगणक प्रयोगशाळा आहे. पत्रकारिता शिकत असताना विद्यार्थ्यांना नव्या-नव्या गोष्टींची माहिती व्हावी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, म्हणून ह्या विभागात वेळोवेळी विविध विषयांवरील कार्यशाळांचे आयोजन केले जाते.

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "सोलापूर विद्यापीठाचा आज नामविस्तार; 'अहिल्यादेवी विद्यापीठ' यांचे नाव देण्याचा निर्णय". लोकमत. ६ मार्च २०१९. १९ जुलै २०१९ रोजी पाहिले.
  2. ^ http://www.dauniv.ac.in/