माल्कम मार्शल
माल्कम मार्शल | ||||
वेस्ट ईंडीझ | ||||
व्यक्तिगत माहिती | ||||
---|---|---|---|---|
फलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने | |||
गोलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने जलदगती | |||
कारकिर्दी माहिती | ||||
कसोटी | ए.सा. | |||
सामने | ८१ | १३६ | ||
धावा | १,८१० | ९५५ | ||
फलंदाजीची सरासरी | १८.८५ | १४.९२ | ||
शतके/अर्धशतके | ०/१० | ०/२ | ||
सर्वोच्च धावसंख्या | ९२ | ६६ | ||
षटके | २,९३०.४ | १,१९५.५ | ||
बळी | ३७६ | १५७ | ||
गोलंदाजीची सरासरी | २०.९४ | २६.९६ | ||
एका डावात ५ बळी | २२ | ० | ||
एका सामन्यात १० बळी | ४ | na | ||
सर्वोत्तम गोलंदाजी | ७-२२ | ४-१८ | ||
झेल/यष्टीचीत | २५/० | १५/० | ||
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
शस्त्रानी दाखवली जाते ती भीती आणि नजरेने बसते ती दहशत. तो तसाच होता. त्याच्या पळण्यात, तिरक्या बॉलिंग रनपमधे दहशत होती. त्याचा बाउंसर खतरनाक होता. साडेसहा फुटाच्या वेस्टइंडियन बॉलरमधे हा पाच फूट अकरा इंच म्हणजे बुटकाच वाटायचा. माल्कम मार्शलचा राग येईल इतका तो फास्ट होता. एवढं असूनही भारतीयच नव्हे तर समस्तं क्रिकेट जग अजूनही वेस्टइंडियन क्रिकेट बद्दल ममत्वं राखून आहे कारण जिगरबाज, खुल्या दिलाची माणसं होती ही सगळी. खेळाची मजा लुटणारे फक्तं तेच एक होते, बिनधास्तं खेळायचे सगळे.
१९८३ च्या वर्ल्डकप पराजयानंतर विंडीज आपल्याकडे आलेली. धुमसत होते नुसते, वर्ल्डकपची हातातोंडाशी आलेली ह्याट-ट्रिक आपल्यामुळे गेली होती. आपल्या गल्लीत येउन त्यांनी आपल्याला मरेस्तोवर मारले अगदी. त्यांनी पाच टेस्टमधे ३-० (दोन अनिर्णित) आणि वनडेमधे ५-० धुतलं आपल्याला. माणसाची महानता आकड्यांवर कधी बघू नये, समोर कोण होतं, परिस्थिती काय होती त्यावर ठरवावी. महानता समजण्यासाठी, उजेडात येण्यासाठी प्रतिस्पर्धी पण तगडा असावा लागतो, तुमची महानता उजळायला त्याची मदतच होते. गावसकर विंडीजचा त्याअर्थानी ऋणी आहे, असायला हवा. गावसकरनी दिल्लीला ब्र्याडमनला इक्वल केलं होतं त्या सिरीजला आणि मद्रासला ओव्हरटेक. इक्वलचं एकोणतिसावं शतक मी पाहिलंय. हेल्मेट नाही, मार्शल राउंड द विकेट यायचा. गावसकरनी ब-याच कालावधीनंतर हूक मारत चौकार मिळवले होते. स्वतःच्या स्टाईलला काळिमा फासत त्यानी ९४ चेंडूत शतक काढलं होतं (त्याचं सगळ्यात जलद). समोर वेन ड्यानिअल, विन्स्टन डेविस, होल्डिंग आणि मार्शल. मार्शल, होल्डिंग समोर जलद शतक काढणं म्हणजे खायचं काम नाही. गावसकरला इझीली मिळालं नाही म्हणून तो महान आणि ते इझीली मिळू दिलं नाही म्हणून तेच मार्शललाही लागू.
त्या दौऱ्यात त्यानी ३३ विकेट्स घेतल्या. फक्तं बाउंसर टाकून विकेट नाही मिळत. तो दोन्ही स्विंग, इनस्विंगिंग यॉर्कर, लेगकटर पण टाकायचा. आधी तो तिरका रनप, मग वेग, मग स्विंग. आउट होणं किंवा धाव घेऊन समोर उभं रहाणं या दोन गोष्टीच सुखकारक होत्या. एकतर त्या टीममधे चार ते पाच आग्यावेताळ एकावेळी खेळायचे, त्यात दुस-याला पडायच्या आधी डल्ला मारल्यासारख्या विकेट पदरात पाडून घ्याव्या लागायच्या. न कुथता त्यानी ८१ टेस्ट मधे ३७६. १३६ वनडेमधे १५७ आणि फर्स्ट क्लास मधे २१७२ विकेटस काढल्यात. वाचून छाती दडपायला होते. त्याच्या डेब्यू म्याचला तो ब्याटिंग करत असताना वेंगसरकर स्लीप मधून काहीतरी लागेल असं त्याला बोलला, ती खुन्नस त्याने जाहीरपणे शेवटपर्यंत ठेवली. तो पळत यायचा तेंव्हाच जीव घेतो की काय फलंदाजाचा असं वाटायचं. माईक ग्याटिंगचं नाक मोडलं होतं त्यानी बाउंसरवर, मार्शलला त्याच्या नाकाच्या हाडाचा तुकडा चेंडूला चिकटलेला मिळाला असं वाचलंय.
पण माणूस चांगला होता. तेंव्हा बंदी असलेल्या दक्षिण आफ्रिकेला जाणा-या बंडखोर विंडीज टीममधे सहभागी होण्यासाठी दहा लाख युएस डॉलर्स नाकारणारा मार्शल. त्याला कर्करोग झाला. शेवटी चार नोव्हेंबर नव्याण्णवला वयाच्या अवघ्या एक्केचाळीसाव्या वर्षी तेंव्हा कसबसं पंचवीस किलो वजन भरेल असा नशिबापुढे हतबल झालेला बावीस यार्डातला टेरर माल्कम मार्शल शेवटचा आउट झाला.
--जयंत विद्वांस
वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|