Jump to content

सदस्य चर्चा:Harshadkhandare

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Harshadkhandare, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Harshadkhandare, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७७९ लेख आहे व १५९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आपण लेखात केलेल्ले बदल साठवण्यासाठी शेवटची पायरी 'जतन करा'

  • दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : शेवटची पायरी लेखात आपण केलेले बदल जतन करणे आपण लेखपान जतन (सेव्ह) करता तेव्हा ते साठवले जाते आणि/अथवा प्रकाशित होते. मराठी विकिपीडिया 'जतन करा' हे शब्द वापरते कारण 'जतन करा' या शब्दाच्या अर्थछटांमध्ये conservation: परिरक्षण, जपणूक वाचवणे, राखणे ; preservation: परिरक्षण , संस्करण,देखभाल keep: ठेवणे जतन करणे, जपून ठेवणे, परिरक्षण करणे, सांभाळून ठेवणे, पालन करणे; राखून ठेवणे, राखणे ;maintenance:निगा (स्त्री.), जतन (न.), सुस्थितीत ठेवणे ४ राखणे (न.), ठेवणे (न.) इत्यादीं अर्थछटांचा समावेश होतो


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

marathimati.com चे दुवे देववले जाणे स्थगित केले आहे

[संपादन]

नमस्कार,

आपल्या मराठी विकिपीडियावरील योगदानांबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. मराठी संकेतस्थळांना आंतरजालावर येऊन जवळपास अठरा वर्षे होत आहेत तर आपल्याच मराठीमाती.कॉम संकेतस्थळासही जवळपास एक तप म्हणजे बारा वर्षे होऊ घातली आहेत. मराठीमाती.कॉम (marathimati.com) च्या माध्यमातून आपण मराठी भाषेची करत असलेल्या बहुमोल सेवे बद्दल कौतुक आणि आदर आहेच. गेल्या बारा वर्षाच्या कालावधीतील आपल्या अथक परिश्रमांनी मराठीमाती.कॉमला स्वत:ची एक जागा स्वावलंबी जागा करून दिली आहेच. मराठीमाती.कॉम (marathimati.com)ला आणि इतरही मराठी संकेतस्थळांना स्वबळावर स्थैर्य प्राप्त होण्यासाठी प्रदिर्घ अनुभव आतापावेतो प्राप्त झाला आहे या बाबीशी आपण सहमत असालच. मराठीमाती.कॉम अथवा इतरही मराठी संकेतस्थळांना सुद्धा शोधयंत्रावरील आपल्या संकेतस्थळाचे स्थान वर यावे/रहावे हे गृहीत धरून संकेतस्थळांचे मराठी विकिपीडियावर दुवे दिले जाण्याची अजूनही गरज शिल्लक असावी असे वाटत नाही.

वर पहिल्या परिच्छेदात नोंदवल्या प्रमाणे इतर मराठी संकेतस्थळांप्रमाणेच आपल्या मराठीमाती.कॉम (marathimati.com)ने आता पावेतो पुरेसे स्थैर्य प्राप्त असणार आहे. marathimati.comच्या स्नेही अनामिक नवागत सदस्यांकडून गेली काही वर्षेपासून (अनवधानाने मोठ्याप्रमाणावर क्वचित अंशत: अनावश्यक प्रमाणातही) marathimati.comचे दुवे दिले जात असल्याचे सातत्याने निदर्शानास आले आहे. येथून पुढे मराठी विकिपीडियाच्या परिघाच्या मर्यादांना संकेतांना अनुसरून अनामिक आणि नवागतांकडून marathimati.com चे दुवे देववले जाणे स्थगित करावे लागत आहे. ज्ञानकोशीय परिच्छेद लेखन करताना सुयोग्य संदर्भ देण्यासाठी जाणकार सदस्य मराठीमाती डॉटकॉमचा उपयोग करत राहतीलच परंतु दुवे देण्याचे काम marathimati.comकडून अथवा त्यांच्या स्नेह्यांकडून जाणीवपुर्वक करवून घेतले जाणार नाही याबाबत आपल्या सहकार्याची नम्र विनंती आणि तसे ते मिळेल असा विश्वास आहे.

ज्ञानकोशीय परिच्छेद लेखन करताना सुयोग्य संदर्भ देण्यासाठी जाणकार सदस्यांना मराठीमाती डॉटकॉमचा उपयोग करता येण्यासाठी मराठीमाती डॉटकॉमवरील प्रतीलेख विषय चार-ते- सहा परिच्छेद साधारणत: ७००० बाईट पर्यंतचा मजकुर अधिक सहजतेने मराठी विकिपीडियावर वापरता यावा म्हणुन मराठीमाती.कॉमने अधिकृत लिखीत स्वरूपात कॉपीराईट बाबत औदार्य दाखवावे अशी एक विनंती आहे. त्यामुळे मराठी विकिपीडियाच्या ज्ञानकोशीय लेखन करणाऱ्या सदस्यांना कॉपीराईटची लगेच टांगती तलवार कमी होऊन मोकळ्या मनाने लेखन करता येईल आणि परिच्छेदातील ओळीत संदर्भ भरताना मराठीमाती डॉट कॉमचे दुवे जाणकारांकडून आपोआपच दिले जातील. मराठीमाती.डॉटकॉमचे हित जपण्यासाठी दुवे दिले गेले असा हितसंघर्षाचा आक्षेपही येण्याचे टळेल म्हणून या परिच्छेदातील विनंती बाबत आपल्या प्रतिसादाची प्रतीक्षा असेल.

मराठीमाती.डॉटकॉमचे कार्य आपल्या नेतृत्वात उत्तरोत्तर वृद्धींगत होऊन मराठी भाषेचा अविभाज्य अंग बनेल असा विश्वास आहेच. आपणास सहकार्याची पुन्हा एकदा विनंती.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:५९, २२ जून २०१४ (IST)[reply]



सुयोग्य बाह्यदुवे

[संपादन]

सप्रेम नमस्कार, आपल्या किंवा आपल्या परिचित अंकपत्त्यावरून(आयपी ऍड्रेसवरून)किंवा आपण स्वतः अलीकडच्या काळात काही विशीष्ट वेबसाईटचे बाह्यदुवे मराठी विकिपीडियावर दिले आहेत का? तसे असेल तर आपणास विनंती आहेकी आपण खालील मु्द्यांचे आवलोकन करून सुयोग्य बदल करावेत.

  • कृपया लक्षात घ्याकी विकिपीडिया हे स्थळ जाहीरातीचे नाही.जाहीरात किंवा शोधयंत्रावरील आपल्या संकेतस्थळाचे स्थान वर यावे/रहावे हे गृहीत धरून संकेतस्थळांचे दुवे देणे अपेक्षीत नाही.
  • शक्यतोवर स्वतःहून/स्वतः निर्देश देऊन स्वतःच्या संकेतस्थळाचे बाह्यदुवे/संदर्भ दुवे देणे टाकवून घेणे कृपया टाळावे.
  • बाह्यदुवे/संदर्भ दुवे लेखातील मजकुराशी संबधीतच असावेत.तसे नसेल तर दुवे उघडून बघणार्‍या वाचकाचा हिरमोड होण्याची शक्यता असते.
  • कृपया आपण सुचवू इच्छित असलेले संकेतस्थळावरील मजकूर दर्जेदार अभ्यासपूर्ण समतोल माहितीने परिपूर्ण असण्याकडे लक्ष दिले तर विकिपीडिया इतर संपादकांचे आपोआपच तीकडे लक्ष जावून सुयोग्य ठिकाणी बाह्यदूवे /बाहय्दुवे अपणहुनदिले जातात.त्यामुळे आपल्याला अपेक्षीत संकेतस्थळाची क्रेडीबिलीटीसुद्धा वाढते.

आपण मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहकार्य करून आपण मराठी भाषा समृद्ध करण्यास मदत करत रहाल अशी अपेक्षा आणि विनंती. आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत! विकिपीडिया मदतचमू ~~~~


श्री./श्रीमती. Harshadkhandare,

सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे.

तुमच्या या अलीकडील संपादनातून तुम्ही स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन/ लेख/ जाहिरात; स्वतःच्याच इतरत्र असलेल्या लेखनाचे/ संकेतस्थळाचे संदर्भ अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करीत आहात असे इतर सदस्यांना वाटण्याची शक्यता आहे, तरी या लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of interest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करून घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद !
संदेश = {{{संदेश}}}
कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा.

{{{संदेश}}}

अष्टविनायक

[संपादन]

अष्टविनायक हा लेख छान झाला आहे. निनाद ०४:०१, ७ फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]

सौमित्रची संचिका

[संपादन]

आपण सौमित्रची संचिका चढवल्याचे पाहिले. पण सदर संचिकेचा कॉपीराईट मराठीमाती डॉट कॉम कडे असल्याचा स्पष्ट उल्लेख संचिकेवरच आहे. प्रताधिकार उल्लंघनाच्या दृष्टीने विकिपीडियावर ते योग्य वाटत नाही. माझ्या माहितीप्रमाणे आपण स्वत:च मराठीमाती डॉट कॉमचे संपादक आहात म्हणून अशा प्रताधिकार उल्लंघनाची अडचण येणार नाही तरी अशा आपल्या अधिकारातील संचिका चढवायच्या झाल्यास संचिका चढवतानाच प्रताधिकार मुक्त करत असल्याची प्रतिक्रीया टाकल्यास चांगलेच होईल.

धन्यवाद.

-संतोष दहिवळ (चर्चा) २१:०३, १६ एप्रिल २०१२ (IST)[reply]

क्षमस्व:

[संपादन]

आमच्या संकेतस्थळाची सर्व अनावश्यक दुवे वगळावे/काढून टाकण्यात यावी गरजेचे वाटल्यास सर्वच दुवे वगळावे/काढून टाकण्यात यावे.. मात्र, कृपया स्पॅम म्हणून नोंद केली जाऊ नये किंवा ब्लॉक केले जाऊ नये ही विनंती. आपण आणि विकिपीडियास झालेल्या तसदीबद्दल क्षमस्व:.

सर्ब प्रथम प्रतिसादासाठी धन्यवाद. क्षमस्वची अपेक्षा नाही कारण विकिपीडिया आपलाच आहे आणि आपण आम्हाला परके नाही. दुवे केवळ वगळायचे म्हणून वगळणे अशीही भूमीका असणार नाही. आपल्या सहकार्यासाठी अत्यंत आभारी आहोत. आपल्या आवडीचे लेखन आणि वाचन होत राहो ही शुभेच्छा आणि पुन्हा एकदा धन्यवाद.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:०९, २२ जून २०१४ (IST)[reply]

संचिका परवाने अद्ययावत करा

[संपादन]

नमस्कार Harshadkhandare,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन

[संपादन]

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत

[संपादन]

नमस्कार Harshadkhandare,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण

[संपादन]

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

हि स्थगीती किती कालावधीसाठी आहे?

[संपादन]

... ... हि स्थगीती किती कालावधीसाठी आहे?

मराठीमाती डॉट कॉमच्या माध्यमातून मराठी विकीपीडियासाठी बरेच योगदान द्यायची ईच्छा आहे, जानकारांनी मार्गदर्शन करावे.

हा माझा अभिप्राय, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! Harshad (चर्चा) ०९:४४, २५ जून २०१७ (IST)[reply]

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया आशियाई महिना २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संतोष गोरे , संदेश हिवाळे किंवा टायविन यांना संपर्क करावा.

धन्यवाद.

आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.