जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ - १५८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १२५६, १२५८ आणि १४५९ यांचा समावेश होतो. जोगेश्वरी पूर्व हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे रविंद्र दत्ताराम वायकर हे जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ रविंद्र दत्ताराम वायकर शिवसेना
२०१४ रविंद्र दत्ताराम वायकर शिवसेना
२००९ रविंद्र दत्ताराम वायकर शिवसेना

निवडणूक निकाल[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".