मायादेवी विहार
मायादेवी विहार | |
---|---|
मायादेवी विहार, लुंबिनी, नेपाळ | |
प्राथमिक माहिती | |
भौगोलिक गुणक | 27°28′10″N 83°16′33″E / 27.469554°N 83.275788°E |
देश | नेपाळ |
अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "[" | |
अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "[" |
महामाया विहार किंवा मायादेवी विहार हे लुंबिनी, नेपाळ येथील एक प्राचीन बौद्ध विहार आहे, जे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानामध्ये समाविष्ट आहे. परंपरेनुसार गौतम बुद्धांचे जन्मस्थान मानले जाणारे हे लुंबिनीमधील मुख्य विहार आहे. हे पवित्र तलाव पुष्कर्णी आणि एक पवित्र उद्यान यांच्या जवळ आहे. या स्थळावरून प्राप्त झालेले सर्वात जूने पुरातत्त्वशास्त्रीय अवशेष इ.स.पू. तिसऱ्या शतकात सम्राट अशोकांनी बांधलेली विटांची वास्तू होती, परंतु इ.स. २०१३ मध्ये, इ.स.पू. सहाव्या शतकातील लाकडापासून बनलेल्या विहाराचा शोध लागला.[१]
२०१३चा शोध
[संपादन]आंतरराष्ट्रीय पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या एका दलाने नोव्हेंबर २०१३ मध्ये मायादेवी विहाराच्या आत खोदकाम सुरू केले. या उत्खननाचे नेतृत्वकर्ता युनायटेड किंग्डमचे डर्हम विद्यापीठाचे रोबिन कॉनिंगहम आणि पशुपति क्षेत्र विकास न्यासचे कोष प्रसाद आचार्य यांनी केले. कॉनिंगहमच्या मते, "बुद्धांच्या जीवनाशी संबंधित ही पहिली पुरातात्त्विक वस्तु आहे."[२][३]
यूनिवर्सिटी कॉलेज लंडनमध्ये दक्षिण आशियाई पुरातत्त्वशास्त्राची प्राध्यापिका जूलिया शॉ म्हटल्या होत्या की, हा शोधलेला बौद्ध विहार बुद्धांच्या काळा पूर्वीच्या वृक्षाची पूजा करण्याचे प्रतिनिधित्व करू शकतो आणि अनुसंधानाची गरज आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]चित्रदालन
[संपादन]-
मायादेवी विहार, २००६
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "लुंबिनी में मिला दुनिया का सबसे प्राचीन बौद्ध विहार". बीबीसी हिंदी. 26 नोव्हेंबर 2013. 27 नोव्हेंबर 2013 रोजी पाहिले.
- ^ "बुद्ध के छठी सदी ईसापूर्व में होने की संभावना". सहारा समय. 26 नोव्हेंबर 2013. 27 नोव्हेंबर 2013 रोजी पाहिले.
- ^ वर्गानो, डैन (25 नोव्हेंबर 2013). "Oldest Buddhist Shrine Uncovered In Nepal May Push Back the Buddha's Birth Date". नैश्नल जिओग्रैफ़िक. 27 नोव्हेंबर 2013 रोजी पाहिले.