मच्छिंद्रनाथ
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| मच्छिंद्रनाथ | |
|---|---|
| चळवळ: | नाथ संप्रदाय |
| धर्म: | हिंदू, बौद्ध |
| प्रभावित: | गोरक्षनाथ |
मत्स्येंद्रनाथ ऊर्फ मच्छिंद्रनाथ (जीवनकाळ: इ.स.चे ९ वे शतक - इ.स.चे १० वे शतक) नवनाथांपैकी एक. हे सिद्धयोगी होते. ते गोरक्षनाथांचे गुरू होते. मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ ही गुरू-शिष्य द्वयी हठयोगाचे प्रवर्तक असल्याचे मानले जाते. कौल मताचे व हठयोगाचे विवरण करणाऱ्या प्राचीनतम ग्रंथांपैकी एक असणाऱ्या कौलज्ञाननिर्णय नावाच्या संस्कृत ग्रंथाचे जनकत्व विद्वानांच्या मतांनुसार त्यांच्याकडे जाते. हिंदू व बौद्ध या दोन्ही धर्ममतांच्या सिद्धपरंपरांमध्ये मच्छिंद्रनाथांचे स्थान आदरणीय मानले जाते. मध्ययुगातील भक्तिचळवळींमध्ये प्रमुख भूमिका बजावणाऱ्या नाथ संप्रदायाचे ते संस्थापक मानले जातात.
तो भी कच्चा बे कच्चा नही गुरू का बच्चा Ι तो भी कच्चा बे कच्चा नही गुरू का बच्चा ΙΙ
गुप्त होकर प्रकट होवे जावे मथुरा काशी Ι ब्रम्हरंद्र से प्राण निकाले सत्य लोक का वासी Ι तो भी कच्चा बे कच्चा नही गुरू का बच्चा ΙΙ
कुंडलिनी खुब चढावे ब्रम्हरंद्र मे जावे Ι चलते है पानी के उपर बोले सो होवे Ι तो भी कच्चा बे कच्चा नही गुरू का बच्चा ΙΙ
कहे मच्छिंद्र सुन रे गोरख तिनो उपर जाना Ι कृपा जब सद्गुरुजी की होवे आप आप को चिना Ι सो ही सच्चा बे सच्चा सो ही गुरु का बच्चा ΙΙ
मंदिरे [संपादन]
- मच्छिंद्रनाथ समाधिमंदिर (‘मायंबा’), मच्छिंद्रगड, (जि. अहमदनगर, महाराष्ट्र)
- मच्छिंद्रनाथ मंदिर, मिटमिटा, औरंगाबाद, महाराष्ट्र
`