जालिंदरनाथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चैतन्य श्री जालिंदरनाथ महाराज जी
पुरस्कार: महायोगी
प्रमुख स्मारके: गर्भगिरी (यावलवाडी)
धर्म: हिंदू धर्म

श्री चैतन्य जालिंदरनाथांचा जन्म सोमयज्ञा मधून झाला आहे हस्तिनापुराचा राजा ब्रिहद्रव सोमयज्ञ करीत असताना त्या त्या यज्ञ मध्ये ऋषी मुनींनी विभूती घेण्यासाठी हाथ टाकला तर त्यात त्यांना एक मुलाचे पाय लागले व त्यांनी त्या मुलाला बाहे काढले अश्या प्रकारे चैतन्य जालिंदर नाथांचा जन्म झाला

त्याच्या जन्माची कथा अशी आहे की आदिनाथ शिव शंकराचं तिसऱ्या नेत्रात अग्नी त्या यज्ञ कुंडा मध्ये सामावला आणि त्या मध्ये अंतरिक्ष नारायणा ने प्रवेश केला त्यातून जालिंदर नाथ प्रकट झाले अग्नितून प्रकट झाले म्हणून त्यांना अग्नी देवाचे पुत्र असे म्हणतात अग्निदेवाचा प्रसाद म्हणून त्या राजाने त्याचा सांभाळ केला जालिंदर नाथ 12 वर्षाचे झोके असता त्यांचे मन संसारात त्या राजवाड्यात लागेल म्हणूनते घर सोडून निघून आले घर सोडून आल्यावर ते राणा वनात फिरत असताना ते एक वनात थांबले व त्याच वेळेस तेथे वणवा लागला व संपूर्ण जंगलाला आग लागली सगळी कडे अग्नी पसरला त्या वनव्यातून जालिंदर नाथ इकडे तिकडे पळत असतांना अग्नी देवाचे लक्ष जालिंदर नाथ वरती पडले आणि त्याच वेळेस अग्नी देवाला त्यांची ओळख पटली व त्यांनी ओळखले की हा तर आपलाच पुत्र आहे पिता पुत्रा ची भेट झाली त्या नंतर अग्निदेवाने त्यांना गुरू दत्तात्रेय याच्या कडे आणले व जालिंदर नाथांना दीक्षा द्यावी असा अनुग्रह केला । अग्नी देवाच्या म्हणण्यानुसार गुरू दत्तने जालिंदर नाथान दीक्षा दिला सर्व विद्या, मंत्र, तंत्र, सिद्धी दिल्या व बद्रीनाथ येथे तपास बसविले.

जालिंदर नाथ हे कानिफनाथ महाराजांचे गुरू आहेत

नाथांची संजीवनी समाधी बीड जिल्यातील येवलवाडी येथे आहे,

नगर-शिरूर-बीड रोड वरती रायमोहा या गावा मधून प्रवेश करून येवल वाडी येथे जाता येते

नवनाथ
मच्छिंद्रनाथगोरखनाथगहिनीनाथजालिंदरनाथकानिफनाथभर्तृहरिरेवणनाथनागनाथचरपटीनाथ