अँड्र्यू अँडी मरे (जन्म: मे १५, इ.स. १९८७, ग्लासगो, स्कॉटलँड) हा एक ब्रिटिश टेनिस खेळाडू आहे. तो ब्रिटनमधील सर्वोत्तम टेनिसपटू असून आजच्या घडीला ए.टी.पी.च्या जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आजवर ८ एटीपी मास्टर्स स्पर्धा जिंकल्या असून पाच वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धांचे उपविजेतेपद मिळवले आहे. एकाच वर्षात चारही ग्रॅंड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या गाठणारा खुल्या जगतातील केवळ सातवा टेनिसपटू तर विंबल्डनची अंतिम फेरी गाठणारा एकमेव ब्रिटिश खेळाडू आहे. २०१२ यू.एस. ओपन स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवून मरे ७६ वर्षांमध्ये ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकणारा पहिलाच ब्रिटिश टेनिसपटू ठरला. ह्यापूर्वी फ्रेड पेरी ह्याने १९३६ साली यू.एस. ओपन स्पर्धा जिंकली होती. ह्यापूर्वी चार ग्रॅंड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेरीत पराभव पत्कारणाऱ्या मरेला पाचव्या वेळेस मात्र स्पर्धा जिंकण्यात यश मिळाले.
२०१२ लंडन ऑलिंपिक स्पर्धेत मरेने रॉजर फेडररला हरवून पुरूष एकेरीमध्ये सुवर्णपदक तर मिश्र दुहेरीमध्ये कांस्य पदक पटकावले.
ग्रॅंड स्लॅम स्पर्धा एकेरी अंतिम फेऱ्या: ६ (१ - ५)[संपादन]
| निकाल |
वर्ष |
स्पर्धा |
कोर्ट प्रकार |
प्रतिस्पर्धी |
स्कोअर |
| उपविजयी |
२००८ |
यू.एस. ओपन |
हार्ड |
रॉजर फेडरर |
2–6, 5–7, 2–6 |
| उपविजयी |
२०१० |
ऑस्ट्रेलियन ओपन |
हार्ड |
रॉजर फेडरर |
3–6, 4–6, 6–7(11–13) |
| उपविजयी |
२०११ |
ऑस्ट्रेलियन ओपन (2) |
हार्ड |
नोव्हाक जोकोविच |
4–6, 2–6, 3–6 |
| उपविजयी |
२०१२ |
विंबल्डन स्पर्धा |
ग्रास |
रॉजर फेडरर |
6–4, 5–7, 3–6, 4–6 |
| विजयी |
२०१२ |
यू.एस. ओपन |
हार्ड |
नोव्हाक जोकोविच |
7-6 (12-10), 7-5, 2-6, 3-6, 6-2 |
| उपविजयी |
२०१३ |
ऑस्ट्रेलियन ओपन (3) |
हार्ड |
नोव्हाक जोकोविच |
6–7(2–7), 7–6(7–3), 6–3, 6–2 |
ऑलिंपिक स्पर्धा[संपादन]
एकेरी: 1 (1–0)[संपादन]
| निकाल |
वर्ष |
स्पर्धा |
कोर्ट प्रकार |
प्रतिस्पर्धी |
स्कोअर |
| विजयी |
२०१२ |
लंडन |
ग्रास |
रॉजर फेडरर |
6–2, 6–1, 6–4 |
मिश्र दुहेरी: 1 (0–1)[संपादन]
संदर्भ आणि नोंदी[संपादन]