ए.टी.पी. मास्टर्स टेनिस स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ए.टी.पी. मास्टर्स टेनिस स्पर्धा ह्या टेनिस खेळातील १० स्पर्धा आहेत. ४ ग्रँडस्लॅम स्पर्धांखालोखाल ह्या मास्टर्स स्पर्धा महत्त्वाच्या व मानाच्या समजल्या जातात. टेनिस श्रेणीमध्ये उच्च स्थानावर असणाऱ्या सर्व पुरुष टेनिसपटूंना ह्या स्पर्धांमध्ये भाग घेणे अनिवार्य आहे. आंद्रे अगासी ह्या अमेरिकन टेनिसपटूने आपल्या कारकिर्दीत १७ मास्टर्स स्पर्धा जिंकल्या आहेत. ह्या मास्टर्स स्पर्धा सध्या जगातील खालील ९ ठिकाणी खेळवल्या जातात.

स्पर्धा देश शहर सुरुवात कोर्टचा प्रकार
इंडियन वेल्स मास्टर्स अमेरिका अमेरिकेची संयुक्त संस्थाने इंडियन वेल्स १९८७ हार्डकोर्ट
मायामी मास्टर्स अमेरिका अमेरिकेची संयुक्त संस्थाने मायामी १९८५ हार्डकोर्ट
मोंटेकार्लो मास्टर्स मोनॅको मोनॅको मोंटे कार्लो, मोनॅको १८९७ क्लेकोर्ट
रोम मास्टर्स इटली इटली रोम १९३० क्लेकोर्ट
माद्रिद मास्टर्स स्पेन स्पेन माद्रिद २००२ क्लेकोर्ट
कॅनडा मास्टर्स कॅनडा कॅनडा माँत्रियाल / टोरोंटो १८८१ हार्डकोर्ट
सिनसिनाटी मास्टर्स अमेरिका अमेरिकेची संयुक्त संस्थाने सिनसिनाटी १९६८ हार्डकोर्ट
शांघाई मास्टर्स चीन चीन शांघाई २००९ हार्डकोर्ट
पॅरिस मास्टर्स फ्रान्स फ्रान्स पॅरिस १९६८ हार्डकोर्ट