असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (इंग्लिश: Association of Tennis Professionals; व्यावसायिक टेनिसपटूंची संघटना, संक्षेपः एटीपी) ही व्यावसायिक पुरूष टेनिसपटूंसाठी १९७२ साली स्थापन करण्यात आलेली एक क्रीडा संघटना आहे. १९९० सालापासून एटीपी जगातील सर्व व्यावसायिक पुरुष टेनिस स्पर्धांचे आयोजन करते व पुरुष खेळाडूंची क्रमवारी कार्यरत ठेवते. टेनिस जगतामधील चार मानाच्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धा, ९ ए.टी.पी. वर्ल्ड टूर मास्टर्स १००० स्पर्धा तसेच वर्षाखेरीस खेळवली जाणारी ए.टी.पी. वर्ल्ड टूर फायनल्स ह्या स्पर्धांचे आयोजन ए.टी.पी.द्वारे केले जाते.

विमेन्स टेनिस असोसिएशन ही संस्था महिला टेनिसपटूंसाठी स्थापन झाली असून तिचे कार्य बव्हंशी ए.टी.पी. समान चालते.

एकेरी क्रमवारी[संपादन]

१४ जानेवारी २०१३[१]
# खेळाडू गूण मागील बदल
1 सर्बिया नोव्हाक जोकोविच 12,920 1
2 स्वित्झर्लंड रॉजर फेडरर 10,265 2
3 युनायटेड किंग्डम अँडी मरे 8,000 3
4 स्पेन रफायेल नदाल 6,600 4
5 स्पेन डेव्हिड फेरर 6,505 5
6 चेक प्रजासत्ताक टोमास बर्डिच 4,680 6
7 आर्जेन्टिना हुआन मार्तिन देल पोत्रो 4,480 7
8 फ्रान्स जो-विल्फेद सोंगा 3,375 8
9 सर्बिया यांको टिप्सारेविच 3,090 9
10 फ्रान्स रिचर्ड गास्के 2,720 10
11 स्पेन निकोलस अल्माग्रो 2,515 11
12 आर्जेन्टिना हुआन मोनॅको 2,430 12
13 अमेरिका जॉन इस्नर 2,215 13
14 क्रोएशिया मारिन चिलिच 2,210 14
15 कॅनडा मिलोस राओनिक 2,175 15
16 फ्रान्स जिल सिमाँ 2,145 16
17 स्वित्झर्लंड स्तानिस्लास वावरिंका 1,900 17
18 जपान काई निशिकोरी 1,870 18
19 जर्मनी फिलिप कोलश्रायबर 1,830 19
20 युक्रेन आलेक्सांदर दोल्गोपोलोव्ह 1,750 20

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]