लॅटिन वर्णमाला
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(रोमन लिपी या पानावरून पुनर्निर्देशित)
| मूळ लॅटिन वर्णाक्षरे | |||||
|---|---|---|---|---|---|
| Aa | Bb | Cc | Dd | ||
| Ee | Ff | Gg | Hh | ||
| Ii | Jj | Kk | Ll | Mm | Nn |
| Oo | Pp | Rr | Ss | Tt | |
| Uu | Vv | Ww | Xx | Yy | Zz |
लॅटिन वर्णमाला (रोमन लिपी) ही जगातील सगळ्यात जास्त वापरली जाणारी लिपी आहे. याची रचना कुमाएन लिपी या ग्रीक लिपीतून झाली. प्राचीन रोमन लोकांनी ही लिपी लॅटिन भाषा लिहिण्यासाठी वापरली.
मध्ययुगात ही लिपी लॅटिनमधून तयार झालेल्या रोमान्स भाषा लिहिण्यासाठी वापरली गेली. यात केल्टिक, जर्मानिक, बाल्टिक व काही स्लाव्हिक भाषांचा समावेश होतो. सध्या ही लिपी युरोपमधील बहुतांश भाषा लिहिण्यासाठी होतो.
युरोपीय वसाहतवाद आणि ख्रिश्चन धर्मप्रसाराबरोबर ही लिपी इतर खंडात पसरली व ऑस्ट्रेलिया, पूर्व आशिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने व आफ्रिकेतील भाषा लिहिण्यासाठी ही लिपी वापरली जाऊ लागली. आता या भाषांमधील उतारे लिहिण्यासाठी पाश्चिमात्य लिपि-विद्वान आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धतीचाही आधार घेतात.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |