मोडी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
- कृपया या लेखाचे मराठीत भाषांतर करा
- या विषयास तज्ञांचे सहकार्य हवे आहे .तज्ञ व्यक्तिंनि चर्चापानावर आपले मत मांडावे व योग्य ते बदल करावेत.
अनुक्रमणिका |
[संपादन] मोडी लिपी काय आहे?
मोडी ही १३व्या शतकापासून २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेची प्रमुख लेखनपद्धती होती.महादेव यादव आणि रामदेव यादव यांच्या राज्यकालात १२६०-१३०९ हेमाडपंत (खरे नांव हेमाद्रि पंडित) या प्रधानाने मोडी लिपीचा विकास केला. छपाईस अवघड असल्यामुळे मोडी लिपीचा वापर मागे पडला आणि देवनागरी लिपीचा वापर सार्वत्रिक सुरू झाला. उर्दूप्रमाणे मोडी लिपी हात न उचलता लिहिली जाते, त्यामुळे वेगाने लिहिणे सोपे जाते. असंख्य मराठी ऐतिहासिक कागदपत्रे मोडी लिपीत असून ऐतिहासिक संशोधनाकरिता मोडी जाणकारांची कमतरता भासते.
[संपादन] मोडी लिपीचा इतिहास
मोडी लिपीच्या उगमाबद्दल अनेक मते व मतभेद आहेत. इतिहासाचार्य वि.का.राजवाडे व डॉ.भांडारकरांच्या मते हेमाडपंताने ही लिपी श्रीलंकेतून आणली, परंतु चांदोरकरांच्या मते मोडी लिपी अशोककालातील मौर्यी (ब्राह्मी)चाच एक प्रगत प्रकार आहे. वाकणकर आणि वालावलकरांच्या मते मोडी लिपी ही ब्राह्मी लिपीचाच एक प्रकार असून हात न उचलता लिहिण्याच्या तिच्या वैशिष्ट्यामुळे इतर लिपींपेक्षा वेगळी झाली आहे. मोडी लिपी श्रीलंकेतून आणली गेली असावी अथवा मौर्यी लिपीवरून विकसित झाली असावी हे म्हणणे वाकणकर आणि वालावलकर यांना मान्य नाही. [पहा: Typography Of Devanagari, १९६१, मुद्रक: महाराष्ट्र सरकार.]
मोडी लिपी महाराष्ट्रात कमीत कमी ९०० वर्षे वापरात आहे. सर्वात जुना उपलब्ध मोडी लेख १४२९ मधील आहे. मोडी लिपी १९५० पर्यंत लिखाणात प्रचलित होती. मोडी हा शब्द फारसी भाषेतील 'शिकस्ता' यावरून आलेला आहे. गेल्या २-३ शतकात मोडी लिपीत अनेक फेरबदल झालेले आहेत. साधारण इ.स. १६००च्या सुमारास चिटणिसी आणी वळणे ही पूर्णपणे प्रगत झाली व यानंतर त्यात फारसे बदल दिसून येत नाहीत. ऐतिहासिक कागदपत्रातील मोडी लिपी क्लिष्ट आणि वाचण्यास कठीण असते.
इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मताप्रमाणे ज्ञानेश्वरी लिहिली जाण्याच्या काळात मोडी संकल्पना महाराष्ट्रात येत होती,याच काळात पहिले मुस्लिम आक्रमण भारतात होत होते.लिखाणाकरिता कागदाचा वापर हा मुस्लिमांनी भारतात सुरू केला असावा कारण कागज हा फ़ार्सी शब्द असून कागज या अर्थाचा संस्कृत शब्द अस्तित्वात नाही.इतिहासाचार्य राजवाडे ज्ञानेश्वरीतील खाली नमूद केलेल्या ओव्यांचा आधार देतात.देवनागरी अक्षरे।अक्षरआडव्या ,उभ्या आणि टोकदार रेषांचा अवलंब करते त्या मुळे लिखाणाच्या हस्तलिखित प्रति बनवताना वेग कमी होतो. तर शिकस्त प्रमाणे गोलाकार व एकमेकांना जोडली जाणारी वळणे वापरुन वापरली जाणारी मोडी हस्तलिखिताचा वेळ वाचवत होती. उद्गारवाचक चिन्हांचा वापर इंग्रजीशी ओळख झाल्या नंतरच भारतीय भाषात सुरू झाला.
१]हे बहु असो पंडीतु , धरुणु बालकाचा हातु,
वोळी लेहे वेगवंतु,आपणाची॥(ज्ञानेश्वरी अध्याय १३,ओवी क्र.३०७)
२]सुखाची लिपी पुसिली ॥ (ज्ञानेश्वरी अध्याय ३,ओवी क्र.३४६)
३]दोषांचीं लिहिलीं फाडीं ॥(ज्ञानेश्वरी अध्याय ४,ओवी क्र.५२)
४]आखरे पुसलिया ना पुसे, अर्थ जैसा ॥(ज्ञानेश्वरी अध्याय ८,ओवी क्र.१७४)
- इ.स.१८०१मध्ये विल्यम कॅरे या सदगृहस्थाने पंडित वैजनाथ यांच्या मदतीने पहिला मोडी लिथोग्राफ,सेरामपुर बंगालयेथे बनवला.
- "रघु भोसल्यांची वंशावळी "," मराठी भाषा व्याकरण","मराठी कोष", "नवा करार "(१८०७). या ग्रंथांची मोडी लिपीत छपाइ केली गेली.
- ख्रिश्चन मिशनरीनी मराठी बायबल मोडी लिपीत छापले.
- ए.के. प्रियोळकर यांनी मोडी छपाईचा इतिहास लिहिला.
[संपादन] मोडी वळणे
चिटणीसी,महादजीपंती,विवाळकरी,रानडी.
[संपादन] मोडी लिपीतील असंख्य दस्तऐवज हे खाली दिलेल्या ठिकाणी संग्रहित केले आहेत.
[संपादन] सौजन्य आणि बाह्य दुवा
वरील मजकूर खालील संकेतस्थळाच्या सौजन्याने: