बॉस ऑपरेटिंग सिस्टिम
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बॉस ऑपरेटिंग सिस्टिम (रोमन लिपी: BOSS ;) ही नॅशनल रिसर्च सेंटर फॉर फ्री/ओपन सोर्स सॉफ्टवेर या भारतीय संस्थेने निर्मिलेली मुक्त ऑपरेटिंग सिस्टिम (संचालन प्रणाली) आहे. बॉस संचालन प्रणाली ही विंडोज् प्रणालीसारख्या महागड्या संचालन प्रणाल्यांना उत्कृष्ट पर्याय आहे. ही संचालन प्रणाली भारतीयांनी भारतीय भाषांसाठी प्रामुख्याने बनवली आहे. ही संचालन प्रणाली मराठी, हिंदी, कोकणी इत्यादी एकूण १८ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे[१].
[संपादन] संदर्भ
- ↑ बॉस लिनक्स. इंग्लिश विकिपीडिया. (इंग्लिश मजकूर)
[संपादन] बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ. (इंग्लिश मजकूर)