Jump to content

रामचंद्र दत्तात्रेय रानडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गुरुदेव रानडे या पानावरून पुनर्निर्देशित)

रामभाऊ दत्तात्रेय रानडे ऊर्फ गुरुदेव रानडे (जुलै ३, १८८६ - जून ६, १९५७) हे भारतीय तत्त्वज्ञ व अलाहाबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते.

गुरुदेव रा.द.रानडे

रा.द. रानडे यांचा जन्म जमखंडी येथे दिनांक जुलै ३, १८८६ रोजी झाला.

शिक्षण

[संपादन]

पुण्यातील डेक्कन कॉलेज येथे त्यांचे शिक्षण झाले. १९१४ साली त्यांनी एम. ए. ही पदवी प्राप्त केली.

कारकीर्द

[संपादन]

गुरुदेव रानडे आधी सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यानंतर ते अलाहाबाद विश्वविद्यालयात तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख झाले. त्या विश्वविद्यालयात त्यांनी १९२७ ते १९४५ पर्यंत तत्त्वज्ञान विषय शिकवला.[] अखेर १९४५ ते १९४७ पर्यंत कुलगुरुपदावर काम करून ते निवृत्त झाले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, व्याख्याने दिली व अनेकांना अनुग्रह देऊन परमार्थाचा प्रसारही केला.[]

पारमार्थिक वाटचाल

[संपादन]

रा. द. रानडे हे इंचगिरी संप्रदायाचे प्रमुख अनुयायी मानले जातात. यालाच निंबर्गी संप्रदाय म्हणूनही ओळखले जाते. नवनाथ संप्रदायाची एक शाखा मानल्या गेलेल्या या शाखेचे संस्थापक भाऊसाहेब महाराज उमदीकर हे मानले जातात. संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी यांच्या विचारांचा प्रभाव या संप्रदायावर आहे.[] आपल्या सेवा निवृत्तीनंतर रानडे हे निंबाळ येथील आश्रमात राहिले आणि त्यांनी पारमार्थिक कार्य सुरू केले.

लेखन

[संपादन]

रा.द. रानडे यांनी थिओसॉफी (ब्रह्मविद्या),तत्त्वज्ञान अशा विविध विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे पाथवे टू गॉड हे पुस्तक इंगजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमधून प्रसिद्ध झाले आहे.समर्थ रामदासांच्या विचारांवर आधारित रामदास वचनामृत हे त्यांचे मराठी भाषेतील पुस्तक आहे. ग्रीक तत्त्वज्ञानाचा अभ्यास असल्याने रानडे यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा विचार करताना त्याला मानसशास्त्र या विषयाची जोडही दिलेली दिसून येते.[] उपनिषदे, मराठी संतसाहित्य यांवरही रानडे यांनी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले आहेत.[] वि.चिं केळकर यांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे.

सन्मान

[संपादन]

रामचंद्र दत्तात्रेय रानडे यांची इंग्रजी-मराठी ग्रंथ संपदा

[संपादन]
  • Autobiography of Gurudev R.D. Ranade : A Discovery (विनायक चिंतामण केळकर)
  • Indian Mysticism : Mysticism In Maharashtra - History Of Indian Philosophy - (इंग्रजी, सातवा खंड)
  • Constructive Survey of Upanishadic Philosophy (इंग्रजी)
  • Sant Tukaram
  • Sant Namdev
  • Sant Eknath
  • Sant Dnyandev
  • Pathway to God (इंग्रजी-मराठी)
  • Mysticism in India : The Poet-Saints of Maharashtra (इंग्रजी)
  • Mysticism in Maharashtra : Indian Mysticism (इंग्रजी)
  • History of Indian Philosophy : The Creative Period (इंग्रजी, सहलेखक - श्रीपाद कृष्ण बेलवलकर)[]
  • Jnaneshwar : The Guru's Guru[]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Kelkar, Vinayak Chintaman; Ranade, Ramchandra Dattatraya (1980*). Autobiography of Gurudev R.D. Ranade: A Discovery (इंग्रजी भाषेत). I.P.Q. Publication, University of Poona. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "loksatta.com". www.loksatta.com. 2020-11-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-12-29 रोजी पाहिले.
  3. ^ Ranade, Ramchandra Dattatraya (1983). Mysticism in India: The Poet-Saints of Maharashtra (इंग्रजी भाषेत). SUNY Press. ISBN 9780873956697.
  4. ^ Kulakarṇī, Padmā (1986). Professor R.D. Ranade: As a Mystic (इंग्रजी भाषेत). Shri Gurudev Ranade Samadhi Trust.
  5. ^ Jñānadeva (1967). Jñānadevī, navavā adhyāya (हिंदी भाषेत).
  6. ^ Sternbach, Ludwik; Ghoshal, U. N. (1962-04). "A History of Indian Political Ideas: The Ancient Period and the Period of Transition to the Middle Ages". Philosophy East and West. 12 (1): 75. doi:10.2307/1397249. ISSN 0031-8221. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  7. ^ Ranade, R. D. (1994-05-31). Jnaneshwar: The Guru's Guru (इंग्रजी भाषेत). SUNY Press. ISBN 9780791420904.