श्याम बेनेगल
श्याम बेनेगल (डिसेंबर १४, १९३४ - डिसेंबर २३, २०२४)[१] हे भारतीय चित्रपट दिग्दर्शिक, पटकथा लेखक व निर्माते होते. समांतर सिनेमाचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे, हे १९७० नंतरचे सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मात्यांपैकी एक मानले जात असे.[२] त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले ज्यात १८ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, एक फिल्मफेर पुरस्कार व एक नंदी पुरस्कार आहे. सोबतच केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री (१९७६) आणि पद्मभूषण (१९९१) देखील प्रदान केले.[३] २००५ मध्ये त्यांना चित्रपटसृष्तीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.
कॉपीरायटर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून, त्यांनी १९६२ मध्ये गुजराथी भाषेत आपला पहिला माहितीपट, घेर बेथा गंगा (दरवाजावर गंगा) बनवला. बेनेगलांचे पहिले चार चित्रपट - अंकुर (१९७३), निशांत (१९७५), आणि भूमिका (१९७७) यांनी समांतर सिनेमा/ नवीन लहर चित्रपट चळवळीचे सुरू केली.[४] बेनेगलच्या "मुस्लिम महिला त्रयी" चित्रपट मम्मो (१९९४), सरदारी बेगम (१९९६), आणि झुबैदा (२००१) या सर्वांनी हिंदीतील सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले.[५] बेनेगल यांनी सात वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.
ते २००६-१२ मध्ये भारताच्या राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य होते.
चित्रपट
[संपादन]- १९७४ - अंकुर
- १९७५ - चरणदास चोर
- १९७५ - निशांत
- १९७६ - मंथन
- १९७७ - भूमिका
- १९७८ - कोंदुरा / अनुग्रहम
- १९७९ - जुनून
- १९८१ - कलयुग
- १९८२ - आरोहण
- १९८३ - मंडी
- १९८५ - त्रिकाल
- १९८७ - सुस्मन
- १९९१ - अंतरनाद
- १९९३ - सूरज का सातवाँ घोडा
- १९९४ - मम्मो
- १९९६ - सरदारी बेगम
- १९९६ - द मेकिंग ऑफ द महात्मा
- १९९९ - समर
- २००० - हरी भरी
- २००१ - झुबैदा
- २००५ - नेताजी सुभाषचंद्र बोस: द फॉरगॉटन हिरो
- २००८ - वेलकम टू सज्जनपूर
- २०१० - वेल डन अब्बा
- २०२३ - मुजीब: द मेकिंग ऑफ अ नेशन
पुरस्कार
[संपादन]- १९७६ - पद्मश्री पुरस्कार
- १९९१ - पद्मभूषण पुरस्कार
- २००५ - दादासाहेब फाळके पुरस्कार
- २०१३ - कलामहर्षी बाबूराव पेंटर जीवनगौरव पुरस्कार
- २०१८ - चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार
संदर्भ
[संपादन]- ^ "प्रख्यात सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल कालवश, चित्रपटसृष्टीवर शोककळा". दैनिक लोकमत. २३ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Shyam-e-ghazal". The Tribune. 29 January 2006. 10 December 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 December 2021 रोजी पाहिले.
- ^ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. 15 October 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 21 July 2015 रोजी पाहिले.
- ^ "Google". www.google.com. 2 July 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 January 2020 रोजी पाहिले.
- ^ Hudson, Dale (9 October 2012). "NYUAD Hosts Shyam Benegal Retrospective". New York University Abu Dhabi. 14 September 2021 रोजी पाहिले.