अंकुर (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अंकुर
दिग्दर्शन श्याम बेनेगल
निर्मिती ललित बिजलानी
कथा श्याम बेनेगल
प्रमुख कलाकार शबाना आझमी
अनंत नाग
साधू मेहेर
प्रिया तेंडुलकर
दलिप ताहिल
संगीत वनराज भाटिया
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १९७५
अवधी १२५ मिनिटे


अंकुर हा एक १९७५ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. श्याम बेनेगल ह्यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट होता. बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी व प्रसिद्ध कन्नड अभिनेता अनंत नाग ह्यांनी अंकुरमधून हिंदी चित्रपट कारकीर्दीची सुरुवात केली.

अंकुर तिकीट खिडकीवर यशस्वी ठरला व त्याला ३ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह एकूण ४३ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. २४व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये अंकुरला सुवर्णपदकासाठी नामांकन मिळाले होते.

बाह्य दुवे[संपादन]