Jump to content

लिव्हरपूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लिव्हरपूल
Liverpool
युनायटेड किंग्डममधील शहर


चिन्ह
लिव्हरपूलचे मर्सीसाइडमधील स्थान
लिव्हरपूल is located in इंग्लंड
लिव्हरपूल
लिव्हरपूल
लिव्हरपूलचे इंग्लंडमधील स्थान

गुणक: 53°24′N 2°59′W / 53.400°N 2.983°W / 53.400; -2.983

देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
घटक देश इंग्लंड
प्रदेश वायव्य इंग्लंड
काउंटी मर्सीसाइड
स्थापना वर्ष इ.स. १२०७
क्षेत्रफळ १११.८४ चौ. किमी (४३.१८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २३० फूट (७० मी)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर ५,५२,२६७
  - घनता ३,८८९ /चौ. किमी (१०,०७० /चौ. मैल)
  - महानगर १३,८१,२००
प्रमाणवेळ यूटीसी±००:००


लिव्हरपूल (इंग्लिश: Liverpool हे इंग्लंडच्या मर्सीसाइड ह्या काउंटीमधील महानगरी बरो व इंग्लंडमधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर मर्सी नदीच्या मुखाजवळ व आयरिश समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते इंग्लंडमधील सर्वात महत्त्वाच्या बंदरांपैकी एक आहे. २०१२ साली ५.५२ लाख लोकसंख्या असलेले लिव्हरपूल इंग्लंडमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

लिव्हरपूल हे इंग्लंडमधील अनेक वैज्ञानिक शोधांचे मूळ आहे. औद्योगिक क्रांतीची सुरुवात येथूनच झाली. लिव्हरपूल ते मँचेस्टर ही १८३० साली धावलेली जगातील सर्वात पहिली व्यावसायिक रेल्वे सेवा होती. जगातील सर्वात पहिला रेल्वे बोगदा लिव्हरपूलमध्ये खणला गेला होता.

पॉप संगीताची जागतिक राजधानी हा खिताब मिळालेले लिव्हरपूल द बीटल्स व इतर अनेक आघाडीच्या ब्रिटिश संगीतकारांचे जन्मस्थान होते. लिव्हरपूलमधील अनेक ऐतिहासिक वास्तूंसाठी त्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत स्थान मिळाले आहे. सध्या लिव्हरपूल हे ब्रिटनमधील एक प्रगत शहर असून सेवा क्षेत्र, पर्यटन इत्यादी येथील प्रमुख उद्योग आहेत. २००८ साली लिव्हरपूल युरोपियन सांस्कृतिक राजधानीचे शहर होते.

फुटबॉल हा लिव्हरपूलमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे व इंग्लिश प्रीमियर लीगमधील लिव्हरपूल एफ.सी.एव्हर्टन एफ.सी. हे येथील लोकप्रिय क्लब आहेत.

जुळी शहरे

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: